इगतपुरी : कसारा घाटात महामार्गाची संरक्षक भिंत तोडून मुंबईहून नाशिकला जाणारा रिकामा कंटेनर दीडशे फूट खोल दरीत कोसळला.मुंबईकडून भरधाव येणाऱ्या ट्रेलर कंटेनररवरील चालकाचा ताबा सुटून कंटेनर (क्र. एमएच ४३ वाय ७५१) कासारा घाटमाथ्यावरील हिवाळा पॉइंटजवळ महामार्ग सुरक्षा संरक्षक भिंतीचा कथडा तोडून खोल दरीत कोसळला. चालकाने शिताफीने उडी मारल्याने जीवितहानी टळली. सुमारे २०० मीटरवर रेल्वेचा ब्रिटिशकालीन हिवाळा ब्रीज आहे. जर या रेल्वे ब्रीजवर कंटेनर पडला असता तर रेल्वेसेवा विस्कळीत झाली असती. मात्र सुदैवाने सुमारे सकाळी ११ वाजता ही घटना घडल्याने कोणतीही रेल्वेगाडी या मार्गावर नव्हती.अपघातस्थळी त्वरित मदत देण्याकामी महामार्ग सुरक्षा पोलीस सहायक पोलीस निरीक्षक सुरेश ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी पोहचले. (वार्ताहर)फोटो : कासारा घाटातील हिवाळा पॉइंट खोल दरीत १५० फूट खोल पडलेला ट्रेलर कंटेनर.
कसारा घाटात कंटेनर कोसळला
By admin | Updated: September 3, 2014 00:35 IST