शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

छाजेडांच्या राजकीय भवितव्यासाठी संप

By admin | Updated: December 20, 2015 00:26 IST

एसटीत सुंदोपसुंदी : मान्यताप्राप्त संघटनेचा आरोप

नाशिक : एसटी कामगारांना २५ टक्के वेतनवाढ देण्याच्या मागणीसाठी इंटकने पुकारलेला संप हा फसवा असून, कामगारहिताऐवजी केवळ अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांच्या राजकीय भवितव्यासाठी करण्यात आल्याचा आरोप मान्यता प्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव प्रमोद भालेकर यांनी केला आहे़ संप मागे घेतल्यानंतर संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप करण्यात आला आहे़भालेकर यांनी सांगितले की, एसटी कामगारांना २०१२-१६ चा वेतनकरार रद्द करून २५ टक्के वेतनवाढ द्यावी, ही मागणीच चुकीची व फसवी आहे़ अयोग्य वेळ व बेकायदेशीरपणे करण्यात आलेला हा संप कामगारांचे व एसटीचे नुकसान करणारा तसेच प्रवाशांना वेठीस धरणारा आहे़ करार संपण्यास केवळ तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असून कामगारांनी सर्व फायदे घेतल्यानंतर हा करार रद्द करून २५ टक्के वाढ करण्याची मागणीच हास्यास्पद आहे़छाजेड विधान परिषदेचे आमदार व काँग्रेसचे सरकार सत्तेवर असताना हा करार झाला आहे़ त्यावेळी त्यांनी १० टक्के मागणी केली होती; मात्र संघटनेने १३ टक्के पगारवाढ मिळवून दिली़ विशेष म्हणजे १० टक्के पगारवाढीचे छाजेड यांनी कौतुकही केले होते़ इंटकचे हे आंदोलन म्हणजे कामगारांचे नसून काँग्रेस पक्षाचे आहे़ या आंदोलनात राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्यांना दमदाटी करणे, बसेसची हवा सोडणे हे प्रकार केल्याचा आरोपही संघटनेने केला़ यावेळी विभागीय अध्यक्ष बाबा वाक्चौरे, सचिव प्रमोद भालेकर, प्रादेशिक सचिव विजय पवार, प्रसिद्धी सचिव भूषण पाराशरे उपस्थित होते़ (प्रतिनिधी)