शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम परवानग्या; मंजुरीप्रक्रिया रखडली

By admin | Updated: February 14, 2017 00:54 IST

प्रशासनही संभ्रमात : आयुक्तांनी मागविले मार्गदर्शन

नाशिक : शहर विकास आराखड्याला राज्य शासनाकडून भागश: मंजुरी मिळाल्यानंतरही त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही आणि नवीन विकास नियमावलीबाबत सुरू असलेला लपाछपीचा खेळ थांबलेला नाही. या कोंडीत बांधकाम परवानग्यांची मंजुरी प्रक्रिया रखडली असून, महापालिकेच्या नगररचना विभागाकडून केवळ प्रकरणे दाखल करून घेतली जात असताना निर्णय मात्र प्रलंबित ठेवले जात आहेत. कात्रीत सापडलेल्या बांधकाम व्यावसायिक व वास्तुविशारदांच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि.१३) आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेऊन कोंडी फोडण्याची विनंती केली. यावेळी आयुक्तांनी शासनाकडून मार्गदर्शन मागविण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.राज्य शासनाने शहर विकास आराखडा भागश: ९ जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध केला परंतु त्यासोबत शहर विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध न करण्याची खेळी खेळली. आराखड्याची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर महिनाभराने त्याच्या अंमलबजावणीस प्रारंभ होतो. परंतु, महिना उलटूनही महापालिकेने नवीन आराखड्यानुसार अंमलबजावणी सुरू केलेली नाही. याउलट महापालिकेच्या नगररचना विभागाकडून दि. ९ फेबु्रवारीपासून बांधकाम परवानग्यांविषयीची नवीन प्रकरणे केवळ दाखल करून घेतली जात असून, नवीन विकास नियंत्रण नियमावलीपर्यंत त्यावर कोणतीही निर्णयप्रक्रिया न राबविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून बांधकाम परवानग्यांची मंजुरीप्रक्रिया पूर्णत: ठप्प झाली आहे. त्यामुळे अगोदरच विविध अडचणींनी पिचलेल्या बांधकाम व्यावसायिकांसह वास्तुविशारद-अभियंत्यांची मोठी कोंडी झाली आहे. महापालिकेने जोपर्यंत विकास आराखड्याची व नवीन विकास नियंत्रण नियमावलीची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत जुनाच आराखडा व विकास नियंत्रण नियमावलीनुसार बांधकाम परवानग्यांसंबंधीची प्रकरणे मंजूर करावीत, या मागणीसाठी क्रेडाई व वास्तुविशारद-अभियंत्यांच्या संघटना पदाधिकाऱ्यांनी सोमवारी आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेतली. परंतु, आयुक्तांनीही त्यावर अधिक भाष्य न करता राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागविण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल, सेक्रेटरी उमेश वानखेडे, अनिल अहेर, मनोज खिंवसरा, प्रदीप काळे, ऋषिकेश पवार, हेमंत दुगड, अरुण काबरे, राजू ठक्कर, सचिन गुळवे, सचिन बागड, नितीन कुटे, रवि महाजन, सुनील गवादे यांसह वास्तुविशारद व अभियंता संघटनांचे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)