शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम शुल्क निम्म्याने कमी होणार

By admin | Updated: February 10, 2016 22:57 IST

बैठक : आमदार-खासदार निधीतल्या कामांना ना हरकत प्रमाणपत्र स्थायीत मिळणार

सिन्नर : बांधकामांना परवानगी देताना यापूर्वी आकारले जाणारे बांधकाम विकास मूल्य आता बांधकामाच्या मूल्याऐवजी विकसित जमिनीच्या किमतीवर आकारण्याचा निर्णय सिन्नर नगरपालिकेच्या मासिक सभेत मंजूर करण्यात आला. त्यामुळे सिन्नरकरांचे बांधकाम विकास मूल्य जवळपास निम्म्याने कमी होणार आहे.६ फेब्रुवारी (शनिवार) रोजी नगरपालिकेची मासिक बैठक सत्ताधारी गटाचे जवळपास निम्मे व विरोधी गटाचे नगरसेवक गैरहजर राहिल्याने गणपूर्तीअभावी तहकूब झाली होती. सदर बैठक पुन्हा आज (बुधवारी) पालिका सभागृहात आयोजित करण्यात आली होती. नगराध्यक्ष आश्विनी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बांधकाम विकास शुल्काच्या निर्णयासह विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली. आमदार, खासदार निधीतून पालिका हद्दीत करण्यात येणाऱ्या विकासकामांना ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्याचा निर्णयही मासिक सभेत मंजूर करण्यात आला. पालिका कार्यालयातील आस्थापनावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणे, पालिका हद्दीतील खुली जागा सिन्नर तालुका वैद्यकीय व्यावसायिक सेवाभावी संस्थेस देणे, स्वच्छ भारत अभियान योजनेंतर्गत सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे, पथदीप बसविणे, बंदिस्त पाई गटारीसह रस्ता काम करणे, पालिकेची तीन तोंडी विहिरीची दुरुस्ती करणे, हुतात्मा चौक ते म्हसोबा मंदिर ते नायगाव रस्त्यापर्यंत विद्युतवाहिन्या भूमिगत करणे आदिंसह विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. बैठकीत माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, नामदेव लोंढे, बापू गोजरे, हर्षद देशमुख, मल्लू पाबळे, विरोधी गटनेते विजय जाधव, प्रमोद चोथवे, शैलेश नाईक, मनोज भगत, डॉ. प्रतिभा गारे, राजश्री कपोते, शीतल कानडी, उज्ज्वला खालकर, लता मुंडे, पुष्पा लोणारे, लता हिले, शुभांगी झगडे, मनीषा घोरपडे, सुजाता गाडे, मंगला जाधव, विजया बर्डे, मुख्याधिकारी संजय जाधव उपस्थित होते, तर उपनगराध्यक्ष संजय नवसे, मेहमूद दारुवाले, हरिश्चंद्र लोंढे अनुपस्थित होते. (वार्ताहर)