शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

जुळलेली नाळ खंडित झाली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2015 23:01 IST

येवला : सभा, आंदोलनाच्या आठवणींना उजाळा

येवला : शेतकरी संघटनेचे पंचप्राण शरद जोशी यांची जीवनयात्रा संपली असली तरी नाशिक जिल्ह्यासह येवल्याशी त्यांची जुळलेली नाळ मात्र कायमची स्मरणात राहील अशीच आहे. १९८९ साली कांद्याचे अचानक भाव कोसळले आणि कांद्याला हमी भाव द्यावा, या मागणीसाठी येवल्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी संघटनेचे उपोषण सुरू झाले. स्वर्गीय मोहनराव गुंजाळ, स्वर्गीय लहानू जेजूरकर, संतू पाटील झांबरे, कांतीलाल जगझाप, शिवाजी वाघ, साहेबराव मढवई, सुभाष सोनवणे,चंद्रकांत साबरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले. या उपोषणाची वार्ता शेतकरी संघटनेचे स्वर्गीय मोहनराव गुंजाळ यांनी कानी घालताच शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी येवल्यात आले. कांद्याच्या जनजागृतीसाठी शेतकऱ्यांची येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठी सभा झाली. सुमारे १० हजार शेतकऱ्यांनी येवल्यातील या सभेला हजेरी लावली. त्या सभेत झालेल्या गगनभेदी घोषणा आजही येवल्याचा शेतकरी विसरलेला नाही. कांद्याला रास्त भाव मिळत नाही तोपर्यंत येवल्यातील कार्यकर्त्यांचे उपोषण सुरूच राहणार असल्याची गर्जना जोशी यांनी येवल्यात केली. आणि ही गर्जना तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या कानावर गेली. त्यांनी तत्काळ शरद जोशी यांना चर्चेचे आमंत्रण दिले. या चर्चेत कांद्याला १०० रु पये प्रतिक्विंटल भाव देणार ही घोषणा शरद पवार यांनी केल्याची आठवण शेतकरी नेते संतू पाटील झांबरे यांनी सांगितली. दरम्यान, लासलगाव येथेही शिवाजी राजोळे, स्मिता गुरव व कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले होतेच. या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यात शेतकरी संघटनेची मुळे घट्ट रोवली गेली. बाजार हस्तक्षेप योजनेनंतर येवल्यात शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली कर्जमुक्ती आंदोलन झाले. मोहन गुंजाळ आणि संतू पाटील झांबरे यांनी येवल्यात पाटपाणीप्रश्नावर आंदोलन सुरू केले. यावेळी शरद जोशी यांची येवल्यात स्वतंत्र पाणी परिषद या विषयावर प्रचंड जाहीर सभा झाली. उच्चाधिकार समितीचे पदाधिकारी वामनराव चटप, सदाभाऊ खोत, रघुनाथदादा पाटील, लक्ष्मण वडेल या सभेसाठी हजर होते. या परिषदेत शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेऊन, पाणीप्रश्न सुटत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गाव बंदी करण्याचा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. कर्जमुक्ती,आणि लक्ष्मीमुक्ती हे दोन कार्यक्र म शरद जोशी यांनी चांदवड येथील जाहीरसभेतून शेतकऱ्यांना दिले. या घोषणेपूर्वी या कार्यक्र माला येवल्यातील बैठकीत अंतिम रूप दिले गेले. (वार्ताहर)