शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यात काँग्रेसची पीछेहाट

By admin | Updated: September 2, 2016 00:15 IST

सटाण्यातील बैठकीत कार्यकर्त्यांची तक्रार : खांदेपालट होण्याची शक्यता

सटाणा : बागलाण तालुक्यात कॉँग्रेस पक्षाची झालेली पीछेहाट, कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ याचे थेट तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया यांच्यावरच खापर फोडले. निवडणुका जिंकायच्या असतील तर सक्षम नेतृत्व द्या अन्यथा भोपळादेखील फुटणार नाही, अशी कैफियत उपस्थित कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, पक्षनिरीक्षक डी. जी. पाटील यांच्याकडे मांडली. त्यामुळे लवकरच कॉँंग्रेसमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.गेल्या आठवड्यात नाशिक जिल्हा कॉँग्रेस कमेटीच्या बैठकीत पक्षातील बागलाणच्या पदाधिकाऱ्यांनी तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया यांच्याबाबत उघड नाराजी व्यक्त करण्यात आली होती. याबाबत पक्षाचे उत्तर महाराष्ट्रचे प्रभारी आमदार भाई जगताप यांनी गंभीर दखल घेत जिल्हाध्यक्ष व पक्षिनरीक्षकांनी स्थानिकांची मते जाणून घेऊन तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, निरीक्षक डी. जी.पाटील यांनी बुधवारी सायंकाळी सटाण्यात तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्याांची बैठक बोलावली होती. बागलाण पंचायत समीतीच्या सभागृहात आयोजित या बैठकीच्या प्रारंभीच शहराध्यक्ष किशोर कदम यांनी कांकरिया यांनाच ‘टार्गेट’ केले. तालुकाध्यक्ष ‘फिजिकली अनफिट’ असल्याची टीका करत पक्षाची झालेली वाताहत पाहता उचलबांगडी करण्यापेक्षा त्यांनी स्वत:च त्या पदाचा त्याग करावा असा सल्ला दिला. सटाणा पालिकेत पक्षाचे एकमेव निवडून आलेले नगरसेवक मनोज सोनवणे यांनी देखील नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त केली. तालुकाध्यक्ष व्यक्तिगत कामासाठीच पदाचा उपयोग करत असल्याचा आरोप करत अशा स्वार्थीपणामुळे पक्षात संघटन राहिले नाही. त्यामुळे आपल्या पक्षाचे कोणी तिकीट घेईल की नाही अशी भीतीही सोनवणे यांनी व्यक्त केली. युवक कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष सिराज मुल्ला यांनी तर थेट पक्षावरच नाराजी व्यक्त केली. पक्षात आमच्या लोकांना मानसन्मान मिळत नाही अशी खंत व्यक्त करत थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आमच्या अल्पसंख्यांक उमेदवाराचा विचार व्हावा अशी मागणी केली. जिल्हा बँकेचे माजी संचालक यशवंतबापू अहिरे यांनीही पक्ष संघटन म्हाताऱ्यांचे काम राहिले नाही, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत त्यासाठी युवकांनी पुढे यावे असे आवाहन केले. खांदेपालट करण्याची मागणीही त्यांनी केली. जिल्हा परिषद सदस्य प्रा. अनिल पाटील ,पंचायत समीती सदस्य परशुराम अहिरे ,रवींद्र पवार यांनीही नेतृत्व बदलाची मागणी केली.