शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

कळवण नगरपंचायतच्या मतदार याद्यांमध्ये गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:21 IST

बदलून गेलेल्या मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याने मतदार यादींचा सावळागोंधळ समोर आला असून, कळवण ...

बदलून गेलेल्या मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याने मतदार यादींचा सावळागोंधळ समोर आला असून, कळवण नगरपंचायतच्या १७ प्रभागांमधील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर या मतदार यादीमधील हा सावळा गोंधळ उघड झाला आहे. अनेकांनी या मतदार याद्यांवर शंका उपस्थित केली आहे. मतदार यादीमध्ये दुबार नावे कमी करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने राबविलेला असताना पुन्हा या याद्यांमध्ये दुबार नावे आली कशी, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. अनेक मतदार गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातून बदलून गेले आहेत, तरीही त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. तर काही प्रभागांत अन्य प्रभागातील मतदारांची नावे समाविष्ट करून प्रभागरचनेची तोडफोड करण्याचे काम केले असून, अनेक प्रभागांत शेजारील मतदारांची नावे आढळून येत नसल्याने इच्छुक उमेदवार व समर्थक यांची डोकेदुखी वाढली आहे. एकाच कुटुंबातील नावाची तोडफोड केली असल्यामुळे मतदान प्रक्रियेवर परिणाम होऊन मतदानाचा टक्का घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इन्फो

प्रारूप मतदार याद्यांत चुका

अनेक प्रभागात समाविष्ट असलेल्या भागातील व परिसरातील मतदार शेजारच्या प्रभागाला जोडून मतदारांची तोडफोड प्रारूप मतदार यादी झाली असल्याने या प्रारूप मतदार याद्या इच्छुक उमेदवारांच्या व मतदारांच्या हक्कावर गंडातर आणणार्‍या असल्याचा आरोप मतदारांनी केला आहे. कळवण नगरपंचायत प्रभाग प्रारूप मतदार याद्या चुकीच्या आणि अन्यायकारक असल्याने मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार असल्याने कळवण नगरपंचायतच्या १७ प्रभागांमधील मतदार याद्या दुरुस्ती कार्यक्रम प्रशासन व निवडणूक आयोगाने हाती घ्यावा, अशी मागणी मतदारांनी केली आहे.

इन्फो

गेल्या निवडणुकीतही होता पोरखेळ

लोकशाहीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या निवडणूक यंत्रणेवरील विश्‍वासाला तडा देण्याचे काम कळवणच्या नगरपंचायतच्या पहिल्या निवडणुकीतदेखील झाले होते. मागील पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत आधी प्रभागरचना, मग चुकीचे आरक्षण सोडत, पुन्हा आरक्षण सोडत निर्माण झालेल्या चुका दुरुस्त होतात न होतात तोच प्रारूप याद्या आणि अंतिम मतदार यादीतील घोळांचे वादळ निर्माण झाले होते. एकापाठोपाठ एक चुका, दोष व त्रुटी पहिल्या निवडणुकीतदेखील निर्माण झाल्या होत्या.