शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांबाबत संभ्रम

By admin | Updated: July 5, 2017 23:29 IST

आकडेवारीवर संशय : शासनाकडून दिशाभुलीची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गटसचिवांचा बहिष्कार व जिल्हा बॅँकेकडे असलेली कर्जदार शेतकऱ्यांची माहिती पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक जिल्ह्णातील कर्जदार शेतकऱ्यांची जाहीर केलेल्या आकडेवारीबाबत कर्जपुरवठा करणाऱ्या संस्थांमध्येच संभ्रम निर्माण झाला असून, शेतकऱ्यांनीदेखील सदरची आकडेवारी फसवी असल्याची तक्रार केली जात आहे. राज्यातील ३६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीवर नाशिक जिल्ह्णातील शेतकऱ्यांना संशय आहे. जिल्ह्णातील एक लाख ३६ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले असले तरी, जिल्हा बॅँकेच्या कारभाऱ्यांनाही या आकडेवारीवर विश्वास नाही. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा नेमका लाभ किती शेतकऱ्यांना मिळणार याबाबत संभ्रम असून, सन २०१७ पर्यंत कर्जदार शेतकऱ्यांचीही कर्जमाफी व्हावी, अशी मागणी राजकीय पातळीवर होऊ लागल्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीत बदल होऊ शकतो, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार २८ जूनपासून विविध कार्यकारी सोसायटीचे गटसचिव बेमुदत संपावर गेलेले असून, कर्जदार शेतकऱ्यांची माहिती त्यांच्याशिवाय अन्य कोणाकडे नाही. अशा परिस्थितीत शासनाकडे कर्जदार शेतकऱ्यांची माहिती जाणे शक्यच नाही. आकडेवारीचा खेळशासनाला सादर केलेल्या माहितीबाबत संभ्रमशासनाच्या निकषाप्रमाणे ३० जून २०१६ पर्यंत दीड लाखापर्यंत जिल्हा बॅँकेचे कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांची संख्या एक लाखाच्या आसपास आहे. तर याच बॅँकेने शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीला सादर केलेल्या माहितीनुसार दीड लाख रुपयांपर्यंत कर्जदार शेतकऱ्यांची संख्या ५० हजार इतकी दाखविली आहे. अशा परिस्थितीत सरकारला सादर केलेली माहिती नेमकी कोणी सादर केली याचा उलगडा कोणीच करू शकलेला नाही.