शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

ंपत्रकारितेत व्रत-व्यवसायाचा संगम

By admin | Updated: July 3, 2017 01:05 IST

नाशिक : पत्रकारितेत आमूलाग्र बदल झाले असून, यामध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लोकमान्य टिळक, आगरकर यांचा आदर्श असलेल्या पत्रकारितेत आमूलाग्र बदल झाले असून, यामध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे़ पत्रकारितेचे मापदंड बदलले असून, जाहिरात की बातमी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, पत्रकारिता ही धर्मादाय संस्था नसून, ती व्रत व व्यवसाय या दोहोंचा संगम आहे़ पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांच्या घटनांमुळे पत्रकारितेचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी या कृत्याची जाहिरात करण्याऐवजी निषेध करावा, असे प्रतिपादन झी २४ तास वृत्तवाहिनीचे संपादक डॉ़ उदय निरगुडकर यांनी केले़परशुराम साईखेडकर नाट्यगृहात रविवारी (दि़२) बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य नाशिक शाखेतर्फे आयोजित पत्रकार मेळाव्यात डॉ. निरगुडकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते़ यासपीठावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल, भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्र म सेन, जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, नरेंद्र पाटील, सुरेश सापळे उपस्थित होते. ब्रिटिश राजवट व स्वातंत्र्योत्तर काळातही वृत्तपत्रातील अग्रलेखांमुळे लोकचळवळी उभ्या राहिल्या़ लोकशाहीच्या या चौथा स्तंभाची सरकारला धास्ती वाटायची़ मात्र, सद्यस्थितीत पत्रकारितेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे़,असे सांगून निगुडकर मुळात पत्रकारिता आणि विश्वासार्हता या दोहोंचा संबंध हा मोबाइल व सीमकार्ड इतका अविभाज्य आहे़ वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांनी वाचक व प्रेक्षकांच्या पाठिंब्यावर आपली विश्वासार्हता टिकवून ठेवल्याचे निरगुडकर यांनी सांगितले़ यावेळी मान्यवरांच्या हस्ते धावपटी कविता राऊत यांना नाशिक भूषण, माहिती व जनसंपर्कसंचालनालयाचे संचालक देवेंद्र भुजबळ यांना पत्रकार वैभव, योगाचार्य गोकुळ घुगे यांना कामगारभूषण तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला़ प्रास्ताविक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महेंद्र देशपांडे यांनी केले.