शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षणाच्या तारखांवरून सदस्य-प्रशासनात संघर्ष

By admin | Updated: July 1, 2017 23:48 IST

जिल्हा परिषद : डझनभर सदस्य आमसभेला मुकणार?

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या ५ जुलैला होत असून, त्या सभेच्या बरोबर एक दिवस आधीपासून सलग तीन दिवसांच्या यशदा येथील प्रशिक्षणावरून जिल्हा परिषद सदस्य व प्रशासन यांच्यात संघर्ष उभा राहिला आहे. आम्हाला प्रशिक्षणही महत्त्वाचे आणि सर्वसाधारण सभाही महत्त्वाची. मग तारखा एकच का घेतल्या, यावरून सदस्य संघर्षाच्या पावित्र्यात आहे.यशदा येथे ४ ते ६ जुलै दरम्यान सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, पेठ व देवळा या तालुक्यातील रूपांजली माळेकर, शोभा डगळे, रमेश बरफ, ज्योती जाधव, कलावती चव्हाण, अनिता बोडके, नूतन अहेर, धनश्री अहेर, यशवंत शिरसाट, भास्कर गावित, हेमलता गावित या ११ जिल्हा परिषद सदस्य व ज्योती राऊत, सुवर्णा गांगोडे, केसरबाई अहिरे, पुष्पा गवळी या चार पंचायत समिती सभापती अशा एकूण १५ लोकप्रतिनिधींची पुणे येथील यशदाच्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. मात्र ५ जुलैला जिल्हा परिषदेची आमसभा बोलविण्यात आल्याने या सदस्यांनी प्रशिक्षणासाठी पुण्याला जाण्यास नकार दिला आहे. कारण सदस्यांच्या दृष्टीने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तीन महिन्यांतून एकदाच बोलविण्यात येणाऱ्या सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे. तसेच पंचायत राज कारभार समजून घेण्यासाठी यशदा येथील प्रशिक्षणास उपस्थिती लावणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे सदस्यांनी हा प्रशिक्षण कालावधी पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.अध्यक्षांवर फोडले खापरप्रशासनाने प्रशिक्षण आणि आमसभा यांच्या तारखांतील गोंधळाचे खापर जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्यावर फोडत आधी प्रशिक्षणासाठी तारीख निश्चित असताना नंतर अध्यक्षांनी आमसभेची तारीख निश्चित केल्याचे स्पष्ट केले आहे. इतकेच नव्हे तर आमसभेऐवजी या ११ जिल्हा परिषद सदस्य व चार पंचायत समिती सभापतींना पुण्याला पाठविण्यासाठी हिरवा कंदील दाखविल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आधीच प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात सुरू असलेला छुपा संघर्ष आता आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहे.