शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षांकडून तक्रारींचा पाढा

By admin | Updated: February 15, 2017 00:37 IST

बैठक : मुख्य निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी येत्या २१ फेबु्रवारीला घेण्यात येणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने नेमलेले मुख्य निवडणूक निरीक्षक व राज्याचे कौशल्य आणि उद्योजकता विकास विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी विविध राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणूकविषयक अडचणी जाणून घेतल्या. यावेळी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी इव्हीएमपासून ते बूथ स्थलांतरणाबाबतच्या विविध तक्रारींचा पाढा कपूर यांच्यासमोर वाचला. मुख्य निवडणूक निरीक्षक दीपक कपूर यांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालयात राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. यावेळी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, मनसेचे माजी आमदार नितीन भोसले, राष्ट्रवादीचे गजानन शेलार, कॉँग्रेसचे नगरसेवक शाहू खैरे, माजी उपमहापौर गुलाम शेख, माकपाचे श्रीधर देशपांडे आदि उपस्थित होते. यावेळी कॉँग्रेस व मनसेने जुन्या नाशिकमधील प्रभाग क्रमांक १३ मध्ये एकूण १४ मतदान केंद्रांच्या स्थलांतरणाचा मुद्दा उपस्थित केला. सदर बूथ हे दूर अंतरावर ठेवण्यात आल्याने मतदानावर परिणाम होण्याची भीती शरद अहेर, शाहू खैरे, नितीन भोसले यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी व आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी याबाबत पाहणी करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच एका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर काही प्रभागात दोन प्रवर्गाच्या मतपत्रिका दिल्या जाणार असल्याने मतदारांचा गोंधळ उडणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. प्रामुख्याने, ग्रामीण भागात अशी व्यवस्था होणार असल्याने चिंता व्यक्त करण्यात आली. परंतु, याबाबत राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा करूनच अंतिम निर्णय होईल, असे दीपक कपूर यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपाने उमेदवारी वाटपप्रसंगी घेतलेल्या दोन लाख रुपयांबाबत आणि भाजपाच्याच पदाधिकाऱ्याने दहा लाख रुपयांबाबत केलेल्या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काय कारवाई झाली, याची विचारणाही कॉँग्रेस-मनसे व राष्ट्रवादीने केली. त्यावेळी कपूर यांनी आचारसंहिता कक्षाकडून चौकशी सुरू असल्याचे सांगितले. यावेळी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी काही सूचनाही केल्या.  निवडणूक निरीक्षक म्हणून उपआयुक्त पी. बी. वाघमोडे, नंदुरबारचे अपर जिल्हाधिकारी अनिल पाटील, उपआयुक्त डॉ. संजय कोलते आणि नगरचे अपर जिल्हाधिकारी बी. एच. पालवे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.