शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कमी दाबाने पाणीपुरवठ्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:15 IST

शेतकऱ्यांना समज देण्याची मागणी नाशिक : गणेशवाडीतील फूल बाजारात सकाळच्या वेळी येणाऱ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना प्रशासनाच्या वतीने समज द्यावी, ...

शेतकऱ्यांना समज देण्याची मागणी

नाशिक : गणेशवाडीतील फूल बाजारात सकाळच्या वेळी येणाऱ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना प्रशासनाच्या वतीने समज द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. या बाजारात अनेक शेतकरी मास्कचा वापर करीत नाहीत. त्याचबरोबर फिजिकल डिस्टसिंगकडेही दुर्लक्ष करतात. यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उघड्यावर होणाऱ्या मांसविक्रीमुळे नाराजी

नाशिक : शहरातील अनेक भागांत उघड्यावर मांसविक्री होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. विविध भागांतील मुख्य रस्त्यांवरच मांसविक्रीची दुकाने असून सकाळपासून सायंकाळपर्यंत या ठिकाणी मांसविक्री सुरू असते. यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिकेने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

किराणा मालाच्या दरवाढीमुळे नाराजी

नाशिक : किराणा मालातील अनेक वस्तूंच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. कोरोनाच्या काळात पगार कमी झालेले असतानाच महागाईचा भडका उडाल्याने आर्थिक ताळमेळ बसविताना अनेकांची घालमेल होत आहे.

वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी

नाशिक : शहरातील अनेक भागांत वाहतूक कोंडीची समस्या कायमचीच झाली असून वारंवार तक्रार करुनही वाहतूक शाखा याकडे लक्ष देत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. रस्त्यावर उभी करण्यात येणारी बेशिस्त वाहनचालक आदी विविध कारणांमुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.

शहरात रंगतेय निवडणुकीची चर्चा

नाशिक : शहरातील सिडको, सातपूर, पंचवटी आदी विविध भागांत आगामी महापालिका निवडणुकांची चर्चा रंगू लागली आहे. चौकाचौकात तरुण, ज्येष्ठ नागरिक याबाबत चर्चा करून आपापल्या पध्दतीने अंदाज व्यक्त करत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे इच्छुकांनी तयारीला सुरुवात केली असून त्यांच्याकडून वेगवेगळ्य कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.

सरपंचपदाने हुलकावणी दिल्याने नाराजी

नाशिक : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या सरपंच आरक्षण सोडतीत आपल्या सोयीचे आरक्षण न निघाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेकांनी सरपंचपदाची स्वप्न पाहिले मात्र आरक्षण सोडतीत सरपंचपद दुसऱ्याच प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. यामुळे अनेक गावांत वादही निर्माण झाले होते.