नाशिक : विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी शासनाकडून आलेले तीन लाख रुपये बॅँक खात्यात जमा असताना आधी खात्यावर रक्कम नसल्याच्या कारणावरून धनादेश परत पाठविला आणि नंतर आरटीजीएस केले तर शाळेच्या खात्यावरून वर्ग झालेली रक्कम संबंधित व्यक्तीच्या नावावर जमाच झालेली नाही. त्यामुळे पोषण आहाराच्या या तीन लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी जिल्हा बॅँक अध्यक्ष आणि मुख्य व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हे दाखल करावे, अशी मागणी करणारा तक्रार अर्ज भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. त्यासंदर्भात पोलिसांनी सहकार उपनिबंधकांचा अभिप्राय मागविला असून, त्यानंतर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.जिल्हा बॅँक आर्थिक अडचणीत आल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत तर नाहीच परंतु शासकीय आणि अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतनही बॅँक देत नाही. त्यामुळे जिल्हाभरात बॅँकेच्या विरोधात उद्रेक झाला आहे. त्यातच आता द्वारका येथील रवींद्र विद्या प्रसारक मंडळाने बॅँकेविरोधात फसवणुकीची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
जिल्हा बँकेविरुद्ध फसवणुकीची तक्रार
By admin | Updated: April 26, 2017 01:25 IST