शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
3
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
4
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
5
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
6
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
7
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
8
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
9
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
10
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
11
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
12
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
13
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
14
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
15
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
16
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
17
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
18
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
19
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

सासऱ्याची जावयाविरुध्द फिर्याद : पतीनेच चोरीचा बनाव करत गरोदर पत्नीला ठार मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 13:47 IST

संशयित भरत याने पोलिसांकडे अद्याप त्याच्या पत्नीच्या खूनाची कबुली दिली नसून त्याने केलेल्या बनावाच्या व्यतीरिक्त तो काहीही माहिती देत नसल्याने प्रमीलाचा खून भरत ने का केला असावा? याचा उलगडा रविवारी (दि.२५) उशिरापर्यंत झालेला नव्हता.

ठळक मुद्देपोलिसांकडून संशयित पतीला अटकखुनाची कबुलीही नाही अन‌् कारणही गुलदस्त्यात

नाशिक : पाथर्डीफाटा येथील म्हाडा घरकुल प्रकल्पाच्या 'सी' विंगमधील दहाव्या मजल्यावरील एका सदनिकेत शनिवारी दुपारी एका गरोदर विवाहितेचा खून झाल्याची घटना घडली होती. यापक्ररणी रात्री उशिरा विवाहितेच्या वडिलांनी त्यांच्या जावयाविरुध्द खूनाचा संशय असल्याची तक्रार इंदिरानगर पोलिस ठाण्यात दिल्याने पोलिसांनी संशयित आरोपी विवाहितेचा पती भरत ढवळा जाधव (२८, रा.फ्लॅट-१००२, म्हाडा इमारत) यास अटक केली आहे. दरम्यान, भरत याने घरात चोर आल्याचा बनाव केल्याचे पोलिसांच्या प्रथमदर्शनी तपासात स्पष्ट झाले आहे.

सातपुर येथील एका दुकानात काम करणारा भरत हा मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील कोकणवाडी येथील रहिवासी आहे. मयत विवाहिता प्रमीला (२६) हिचा विवाह दोन वर्षांपुर्वी भरसोबत झाला. सुरुवातील भरत हा प्रमीलाला घेऊन पांडवलेणी परिसरात भाड्याने खोली घेऊन राहत होता. गेल्या वर्षभरापुर्वीच प्रमीला यांचे वडील फिर्यादी तानाजी सावळीराम कचरे (५४, रा. कचरवाडी, ता.इगतपुरी) यांचा भाचा सचिन झोळे याच्या मालकीची म्हाडा इमारतमधील सदनिकेत राहत होते.शनिवारी प्रमीलाचा पती संशयित भरत याने स्वत: पोलीस नियंत्रण कक्षास संपर्क साधून ह्यघरात चोरटे आले व त्यांनी दागिणे घेऊन माझ्या पत्नीला ठार मारुन पळून गेलेह्ण असे सांगितले; मात्र मयत प्रमिलाच्या शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांकडून नमुद करण्यात आलेली मृत्यूची वेळ आणि घटना यामध्ये मोठी तफावत असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांचा भरतवर अधिकच संशय बळावला. तसेच घरात कुठल्याही प्रकारची मोठी रोकड नव्हती आणि प्रमीलाच्या अंगावर केवळ मंगळसुत्र आणि कानातले टॉप्सव्यतिरिक्त अन्य दागिणे नव्हते. तसेच घरातील कुठलेही सामान अस्ताव्यस्त झालेले नाही, आणि काही चोरीलासुध्दा गेलेले नाही, असे प्रमीलाचे वडील तानाजी यांनी फिर्यादीत म्हटले असून माझा जावई भरत यानेच प्रमीलाचे तोंड उशीने दाबून व गळा टॉवेलने आवळून ठार मारल्याचा संशय व्यक्त केला आहे. संशयित भरत याने सांगितलेली हकीगत घटनास्थळावरील कुठल्याही बाबीशी सुसंगत नसून ती पटणारी नसल्याचेही त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.खुनाची कबुलीही नाही अन‌् कारणही गुलदस्त्यातप्रमीलाचा काहीतरी कारणावरून तिचा पती भरत जाधव यानेच खून केल्याचा संशय फिर्यादीत कचरे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, संशयित भरत याने पोलिसांकडे अद्याप त्याच्या पत्नीच्या खूनाची कबुली दिली नसून त्याने केलेल्या बनावाच्या व्यतीरिक्त तो काहीही माहिती देत नसल्याने प्रमीलाचा खून भरत ने का केला असावा? याचा उलगडा रविवारी (दि.२५) उशिरापर्यंत झालेला नव्हता. भरत यास पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी सुनावली. या खुनाचा तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक नीलेश माईनकर हे करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMurderखूनArrestअटक