शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार करणाऱ्यांना ‘मातोश्री’वर प्रवेश बंद

By admin | Updated: July 31, 2016 00:59 IST

तक्रार करणाऱ्यांना ‘मातोश्री’वर प्रवेश बंद

 सिडको : शिवसैनिक ते पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी एकदिलाने, एकसंघ राहून पक्षाचे काम करावे. नाशिकमध्ये टाचणी जरी पडली तरी मातोश्रीवर समजते. यासाठी यापुढील काळात मातोश्रीवर तक्रारींना वाव नसून तत्त्व, मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकसंघ राहून विरोधकांना नेस्तनाबूद करावे, असे आवाहन शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई यांनी केले.सिडकोतील प्रभाग ४७ मध्ये शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर व हर्षा बडगुजर यांच्या विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी देसाई बोलत होते. खासदार देसाई म्हणाले शिवसेना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेची कामे करीत नसून सत्ता असली किंवा नसली तरी सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसैनिक हा त्याचे कार्य सुरूच ठेवतो, असे सांगून भाजपा सरकारने वेगळा विदर्भाचा मुद्दा उपस्थित करून, खरे दात दाखविण्यास सुरुवात केली असली तरी शिवसेनेची भूमिका ही अखंड महाराष्ट्राचीच असून, यासाठी यापुढील काळातही शिवसेना शांत बसणार नाही, असेही ते म्हणाले. सिडको मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये शत-प्रतिशत म्हणणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या व नाशिक महापालिकेत एक हाती सत्ता आणण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून एकदिलाने कामाला लागावे, असेही शेवटी खासदार देसाई यांनी सांगितले. शिवसेना उपनेते बबन घोलप, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी प्रभागात केलेल्या कामांची यादी सादर केली व भविष्यात प्रभागातील पाणीप्रश्न भेडसावू नये यासाठी भूमिगत जलकुंभ उभारल्याने पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे सांगितले.यावेळी व्यासपीठावर आमदार राजाभाऊ वाजे, अनिल कदम, योगेश घोलप, जयंत दिंडे, सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, माजी महापौर विनायक पांडे, मामा ठाकरे, महिला आघाडीच्या अ‍ॅड. शामला दीक्षित, माजी सिडको प्रभाग सभापती कल्पना पांडे, दीपक बडगुजर आदि उपस्थित होते.सूत्रसंचालन दीप्ती देशमुख यांनी, तर स्वागत नगरसेवक हर्षा बडगुज यांनी केले. आभार दीपक बडगुजर व मयुरेश बडगुजर यांनी मानले. कार्यक्रमास नाशिक पश्चिम मतदारसंघ प्रमुख प्रवीण तिदमे, उपमहानगरप्रमुख सुनील पाटील, माजी नगरसेवक सीमा बडदे, दिलीप दातीर, सुभाष गायधनी, श्याम साबळे, माणिक सोनवणे, दादाजी अहिरे, नाना पाटील, बी. एल. श्रीवास्तव, राजेंद्र नानकर, बारकू शेलार, पवन मटाले, पिंटू भामरे, योगेश पवार, राम सूर्यवंशी, युवराज दराडे, अंकुश शेवाळे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)