शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

आरोग्यसेविकांनी रडत वाचला तक्रारींचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 17:46 IST

सिन्नर : तालुक्यातील वावी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. त्रिरश्मी बुकाने या कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याच्या आरोप करीत केंद्रातील कर्मचाºयांसह आरोग्य सेविका, आशा कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून काम करीत आंदोलनास प्रारंभ केला.

ठळक मुद्देवावी केंद्र : वैद्यकीय अधिकारी त्रास देत असल्याने काळ्या फिती लावून आंदोलन

सिन्नर : तालुक्यातील वावी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. त्रिरश्मी बुकाने या कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याच्या आरोप करीत केंद्रातील कर्मचाºयांसह आरोग्य सेविका, आशा कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून काम करीत आंदोलनास प्रारंभ केला.आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावर ठिय्या देत आरोग्य सेविकांसह व आशा कार्यकर्त्यांनी अक्षरश: रडत जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांसह स्थानिक लोकप्रतिनिधींसमोर आरोग्य अधिकाºयांच्या तक्रारींचा पाढा वाचला. डॉ. बुकाने या आरोग्य सेविका, कर्मचारी व आशा कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यासह जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आरोप करीत आरोग्य सेविका, सहाय्यक, कर्मचारी व आशा कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून आंदोलनास प्रारंभ केला. याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, उदय सांगळे, वावीच्या सरपंच नंदा गावडे, उपसरपंच विजय काटे, सदस्य ईलाहीबक्ष शेख, दीपक वेलजाळी, आदींनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. प्रवेशद्वारातच आरोग्य सेविका, सहाय्यक, कर्मचारी व आशा कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला होता. जिल्हा परिषद या सदस्यांना कहाताच आंदोलनकर्त्यांनी तक्रारीचा पाढा वाचण्यास प्रारंभ केला. हे सांगताना आरोग्य सेविका अक्षरश: रडत असल्याचे चित्र होते. वैद्यकीय अधिकारी बुकाने या हेतूपुरस्कार त्रास देणे, धमकी देणे, मानसिक त्रास देणे करीत असल्याचे आरोग्य सेविकांनी सांगितले. बुकाने या सकाळी ११ वाजता येतात व दुपारी ४ वाजता निघून जातात. रात्रीच्यावेळी प्रस्तूतीसाठी येणाºया महिलांची व रुग्णांची गैरसोय असल्याचे त्यांनी सांगितले.वैद्यकीय अधिकाºयांच्या विरोधात तक्रारी केल्यानंतर त्या गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. वैद्यकीय अधिकारी डॉ. बुकाने यांची बदली करुन येथे पर्याय वैद्यकीय अधिकारी देण्याची मागणी कर्मचाºयांनी केली किंवा आमच्या सर्वांची बदली करा असेही सांगितले. बुकाने यांची तातडीने बदली करुन येथे अन्य दुसºया वैद्यकीय अधिकाºयाची नेमणूक करण्याची सामुदायिक मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. सांगळे व केदार यांनी रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य सेविका व कर्मचाºयांना केले. कर्मचाºयांचे मागण्यांचे निवेदन व भावना मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पोहच करणार असल्याचे आश्वासन केदार व सांगळे यांनी दिले. आंदोलनकर्त्यांची समजूत काढून त्यांना गोवर व रुबेला लसीकरणाच्या कामावर जाण्याची विनंती केली. त्यानंतर कर्मचाºयांनी ठिय्या आंदोलन मागे घेत लसीकरणाच्या कामावर जाणे पसंत केले. निवेदनावर आरोग्य सेविका यांच्यासह अंगणवाडी सेविका, कर्मचारी यांच्या स्वाक्षºया आहेत.चौकट- लसीकरणास प्रारंभवावीच्या आरोग्य सेविका आणि कर्मचाºयांनी बुधवारी काळ्या फिती ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर उदय सांगळे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर त्यांच्या भावना व मागण्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे पोहचविण्याचे आश्वासन दिल्यानंतर कर्मचाºयांनी गोवर व रुबेला लसीकरणाच्या कामास प्रारंभ केला.