शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

काम करणाऱ्यांपेक्षा न करणाऱ्यांनीच मतदारांचे मानले आभार भाजपत श्रेयवादाची स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 01:27 IST

नाशिक : नाशिक शहरातील तिन्ही जागा भाजपने जिंकल्यानंतर श्रेय घेण्यास अनेक जण सरसावणे स्वाभाविक आहे,

नाशिक : नाशिक शहरातील तिन्ही जागा भाजपने जिंकल्यानंतर श्रेय घेण्यास अनेक जण सरसावणे स्वाभाविक आहे, मात्र ज्यांनी पक्षाचे काम केले नाही असे अनेक जणदेखील मतदारांचे बल्क एसएमएस आणि सोशल मीडियावर आभार मानत असल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.निवडणुकीत अनेक पक्षांतील अनेक जण इच्छुक असतात. विशेषत: सत्ताधारी किंवा संभाव्य विजेत्या पक्षांकडे इच्छुकांची रांग असते. नाशिक शहरातील तीन जागा भाजपकडे असल्याने साहजिकच इच्छुकांची स्पर्धा अधिक होती; परंतु पक्षाने आपल्या ध्येय धोरणानुसारच उमेदवारी दिली आणि त्यामुळे पक्षातील अनेक जण नाराज झाले. परंतु त्यातील अनेकांची नाराजी दूर करण्यात पक्षाला यश आले आणि ते कामालाही लागले. नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपने अनेक जण इच्छुक होते त्यांनीदेखील नंतर पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे काम केले. महापालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासूनच मतदारसंघ पिंजून काढला होता आणि जनसंपर्कासाठी अनेक उपक्रम राबवून पूर्णत: तयारी केली होती; मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी पक्षाचा निर्णय मान्य असे म्हणून सीमा हिरे यांच्या प्रचाराची धुरा घेतली. सातपूरमधून माकपाचे डी. एल. कराड आणि शिवसेनेचे बंडखोर विलास शिंदे उभे असतानाही त्यांना रोखून भाजपला निवडून देण्यात दिनकर पाटील यांची भूमिका मोलाची राहिली. अशाच प्रकारे नाशिक मध्यमधील भाजपचे इच्छुक उमेदवार वसंत गिते यांना पक्षाने संधी नाकारली. मात्र, त्यानंतरदेखील त्यांच्याकडे पश्चिम नाशिकची जबाबदारी दिली आणि त्यांनीदेखील त्यात लक्ष घालून यश मिळवून दिले.नाशिक पूर्वमध्ये बाळासाहेब सानप यांना उमेदवारी नाकारल्यानंतर या पक्षातील उद्धव निमसे यांनी अखेरपर्यंत उमेदवारीसाठी प्रयत्न केले. परंतु पक्षाने अ‍ॅड. राहुल ढिकले यांना उमेदवारी दिल्यानंतर निमसे हे प्रचारात कार्यरत झाले. अशाच प्रकारे तिन्ही मतदारसंघातील अनेक भाजप इच्छुकांनी नंतर मात्र पक्षावर निष्ठा ठेवून कामकाज केले. त्यामुळे यशात त्यांचा वाटा मोलाचा राहिला आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक