शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात बनावट नोटांसह कमिशनच्या गोरखधंद्यात तेजी!

By admin | Updated: December 24, 2016 01:16 IST

आयकर विभागाची कारवाई : चालू महिन्यातच जप्तीच्या तीन घटना

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनबंदीची घोषणा केल्यानंतर देशभरातील अनेक ठिकाणी पोलीस व आयकर विभागाने छापे टाकून जुन्या व नवीन चलनी नोटा जप्त केल्या़ नाशकात डिसेंबर महिन्यातच नोटा जप्तीच्या तीन घटना घडल्या आहेत़ या सर्व घटनांमधील कडी करणारी गुरुवारची घटना आहे़ या घटनेमुळे नाशकात केवळ कमिशनद्वारे नोटांची अदलाबदल केली जात असून, नोटांची छपाईदेखील केली जात असल्याचे पोलिसांनी संशयितांवर दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे समोर आले आहे़चलनबंदीनंतर सरकार दररोज वेगळ्या नियमांची घोषणा करीत होते, तर सर्वसामान्य नागरिक पैसे मिळावेत यासाठी बँकांचे उंबरठे झिजवित होते़ या सर्व परिस्थितीचा फायदा घेऊन कमिशनवर काळ्याचे पांढरे करणाऱ्यांचा धंदा चांगलाच तेजीत आला़ कमिशनवर जुन्या नोटा स्वीकारून नवीन नोटा दिल्या जात असल्याचे सरकारवाडा व इंदिरानगर पोलिसांनी चौघा संशयितांकडून ३० लाख रुपये जप्त केल्यानंतर समोर आले़पोलिसांनी गुरुवारी (दि़ २२) मध्यरात्री हॉटेल जत्रासमोर तीन वाहनांतून अकरा संशयितांना अटक केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे़ या संशयितांकडे जुन्या चलनातील खऱ्या नोटा कमी व बनावट नोटांचा भरणाच अधिक होता़ विशेष म्हणजे या नोटा नाशकात छापण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे़ पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांवर दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये भारतीय दंडविधान कलम ४८९-ड चा समावेश आहे़ या कलमाचा अर्थ बनावट व चलनी नोटा तयार करण्यासाठी आवश्यक असलेली साधनसामग्री जवळ बाळगणे अथवा तयार करणे असा आहे़त्यामुळे पोलिसांनी अटक केलेले संशयित हे केवळ कमिशनवर नोटा बदलून देत नव्हते तर बनावट नोटांची छपाईही करीत होते असा अर्थ होतो़ या संशयितांकडून नोटा छापण्याची सामग्रीही पोलिसांनी जप्त केल्याची चर्चा असून, यामधील आरोपींची संख्येत वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़ तसेच या संशयितांबरोबर आंतरराज्य वा आंतरराष्ट्रीय टोळीच्या सहभागाची शक्यता नाकारता येणार नाही़ नाशिकमध्ये मोठ्या संख्येने  सुरू असलेल्या बनावट व कमिशन नोटांवरील गोरखधंद्यास चाप लावण्याचे आयकर व पोलीस यांचे प्रयत्न सुरू आहेत़ (प्रतिनिधी)