शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरीचे प्राचीन कुंड काँक्रिटमुक्त करण्यासाठी आयुक्तांना साकडे

By admin | Updated: February 6, 2017 19:32 IST

प्राचीन सोळा कुंड पुनर्जीवित करण्याचे आदेश एका जनहित याचिकेच्या निकालात मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने देण्यात आले

ऑनलाइन लोकमतनाशिक,  दि. 6 - गोदावरी नदीला प्रदूषणमुक्त आणि बारामाही नैसर्गिकरीत्या प्रवाहित ठेवण्यासाठी गोदावरीच्या उपनद्या, नैसर्गिक नाले आणि प्राचीन सोळा कुंड पुनर्जीवित करण्याचे आदेश एका जनहित याचिकेच्या निकालात मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने देण्यात आले आहेत. या निकालानुसार याचिकाकर्ता देवांग जानी यांनी जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांची भेट घेऊन याबाबत लक्ष वेधले होते. त्यानुसार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पाण्याचा मानवी वसाहतींशी संबंध या विषयावर संशोधन करणाऱ्या नाशिकच्या अभ्यासक वास्तुविशारद डॉ. प्राजक्ता बस्ते यांनी गोदावरी पुनर्जीवित करण्यासाठी भुगर्भशास्त्रानुसार उपाययोजनांचा अहवाल तयार केला. सदर अहवाल व त्याआधारे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यापुढे सोमवारी गोदावरी प्रगट दिनाच्या औचित्यावर बस्ते यांनी सविस्तर पणे सादर केले. यावेळी याचिकाकर्ता गोदावरी नागरी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी, गोदाप्रेमी राजेश पंडित, निशिकांत पगारे, अभिनेता चिन्मय उदगीरकर, धनश्री, क्षीरसागर आदी उपस्थित होते. उच्च न्यायालयाने निकालात दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये अहवाल सादरीकरणानंतर तत्काळ उपाययोजना कराव्यात, असे नमूद केले आहे. महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर गोदावरीला नैसर्गिक प्रवाह कसा उपलब्ध करून देता येईल तसेच प्राचीन कुंड व उपनद्या, नाले पुनर्जीवित करण्याबाबत अहवालात सुचविलेल्या उपाययोजनांबाबत ठोस निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्याची ग्वाही कृष्ण यांनी शिष्टमंडळाला दिली.