शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

१ लाखाहून अधिक गणेश मूर्तींचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:17 IST

नाशिक- गोदावरीसह अन्य नद्यांचे प्रदूषण टाळण्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही राबवण्यात आलेल्या विसर्जित मूर्ती दानाच्या आवाहनाला चांगला ...

नाशिक- गोदावरीसह अन्य नद्यांचे प्रदूषण टाळण्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही राबवण्यात आलेल्या विसर्जित मूर्ती दानाच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून एकूण १ लाख १३ हजार ८६१ मूर्तींचे संकलन करण्यात आले आहे. याशिवाय यंदा प्रथमच मोठ्या गृहनिर्माण संस्थेसाठी राबवण्यात आलेल्या 'टॅँक ऑन विल्स' म्हणजेच फिरत्या कृत्रिम तलावांच्या उपक्रमालादेखील चांगला प्रतिसाद मिळाला असून एकूण१०४८ मूर्तींचे दान मिळाल्याने हा प्रयोग देखील कमालीचा यशस्वी ठरला आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने गणेश उत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी मिशन विघ्नहर्ता राबवण्यात आले होते. कोराेनाची दुसरी लाट ओसरली असली तरी संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता गर्दी आणि त्यातून होणारा संसर्ग टाळण्यासाठी महापालिकेने ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंगची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचा दोन हजारांहून अधिक नागरीकांनी लाभ घेतला. अशाप्रकारच्या लिंकचा वापर करणाऱ्या नागरिकांना महापालिकेने क्यू आर कोड जनरेट झाल्यानंतर ई प्रमाणपत्रही प्रदान केले. तसेच २ हजार किलोहूनही अधिक अमोनियम बायकार्बोनेट घरच्या घरीच गणेश विसर्जन करण्यासाठी दिले होते.

महापालिकेच्या वतीने दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशीच गणेश मूर्ती संकलन यापूर्वी करण्यात येत होते. यंदा मात्र महापालिकेने दीड दिवसांचा गणपती, तीन दिवस, पाच दिवस आणि सातव्या दिवशी विसर्जित होणाऱ्या एकूण ५ हजार १५१ मूर्ती संकलित करण्यात आले आहेत. तर अखेरच्या दिवशी २७ अधिकृत विसर्जन स्थळे घोषित करण्यात आली होती तर ४३ कृत्रिम तलाव घोषित करण्यात आले होते. याशिवाय महापालिकेने ५० पेक्षा अधिक सदनिका असलेल्या गृहनिर्माण संस्थांवर कारवाई करण्यात आली आहे.

इन्फो...

निर्माल्याचे संकलन

दरवर्षी प्रमाणे यंदाही महापालिकेने निर्माल्य संकलन केले. यंदा एकूण तब्बल ११७.८५ टन निर्माल्य संकलित करण्यात आले. पंचवटी विभागातून सर्वाधिक ३०.८४ टन, त्याखालोखाल सातपूर २५.२५ टन, सिडको १९.१६ टन, नाशिक पश्चिम १६.३४ टन, नाशिकरोड १४.८७, तर नाशिक पूर्व विभागातून ११.३९ टन निर्माल्य गोळा करण्यात आले. त्यासाठी महापालिकेने खास ७६ वाहनांची सोय करण्यात आली होती.