नाशिक : गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेला नाशिकचा विमानतळाचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. राज्य शासनाकडून एचएएलला पॅसेंजर टर्मिनलची जागा नाममात्र दराने दीर्घ मुदतीसाठी देण्यात येणार असून, केंद्र शासनाने त्यास अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गेल्या फेब्रुवारीतच ओझर विमानतळावर पॅसेंजर टर्मिनलचे बांधकाम करून त्याचे उद््घाटन करण्यात आले आहे. परंतु एचएएलच्या आवरातील ही टर्मिनल बिल्ंिडग आणि अन्य सुविधा हस्तांतरावरून विमान सेवा रखडली आहे. परंतु संरक्षणमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर हा तिढा सुटणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. लोकमतच्य्या बिझनेस आयकॉन्स आॅफ नाशिक या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन समारंभात बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, विमानतळासंदर्भातील जागा हस्तांतरणासाठी राज्य शासन तयार आहे; परंतु मालकी सोडता येणार नाही, त्यामुळे एक रुपये अशा नाममात्र दराने दीर्घ मुदतीसाठी हस्तांतर करता येईल. यासंदर्भात केंद्रीय संरक्षणमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी त्यास अनुकूलता दाखवित तातडीने प्रस्ताव मागितला आहे. त्यामुळे महिनाभरात विमान सेवा सुरू होऊ शकेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्य सरकारच्या भूमिकेमुळे गेल्या वर्षभरापासून रखडलेला विषय मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे हा राज्य सरकार आणि एचएएल यांच्यातील तिढा सुटला नसतानाही अनेक कंपन्यांनी नाशिकमधून विमान सेवा देण्यास अनुकूलता दर्शविली आहे.(प्रतिनिधी)
मुख्यमंत्री : वैधानिक महामंडळाचे नाशिकला मुख्यालय शक्य
By admin | Updated: December 27, 2014 00:53 IST