शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व भागात ढगाळ वातावरणाने शेतकरी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:14 IST

एकलहरेः नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात दिवसभर उन्हाचा कडाका जाणवत असून, दुपारनंतर ढगाळ वातावरण होत असल्याने पाऊस पडण्याच्या भीतीने शेतकरी ...

एकलहरेः नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात दिवसभर उन्हाचा कडाका जाणवत असून, दुपारनंतर ढगाळ वातावरण होत असल्याने पाऊस पडण्याच्या भीतीने शेतकरी कांदे काढणी, गहू सोंगणीच्या कामात व्यस्त झाले असून, एकीकडे ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातलेले असताना दुसरीकडे शेतातील उभी पिके हातची जाण्याची भीती असल्याने शेतकरी वर्ग सहकुटुंब शेती कामात व्यस्त झाला आहे.

काही शेतकऱ्यांचा गहू तयार झाल्याने त्यांनी यापूर्वीच हार्वेस्टरच्या साहाय्याने गहू काढून मार्केटला नेला आहे. मात्र उशिरा पेरलेल्या गव्हाची कापणी काही ठिकाणी अजूनही सुरु आहे. नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये लावलेला उन्हाळा व लाल कांदा काढण्याचे काम सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरु आहे. कांदे काढून झाल्यावर काही शेतकरी चाळीत साठवून ठेवतात तर काहींंना पैशांची गरज असल्याने विक्रीसाठी मार्केटला नेतात. बऱ्याच ठिकाणी नवीन लावलेली कोबी, फ्लॉवर, टोमॅटोतील तण निंदणीची कामे सुरु आहेत. सध्याच्या वातावरणातील बदलामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. पाने कुरतडणारी अळी, लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने महागडी औषधे फवारणी करावी लागत आहे.त्यामुळे भांडवली खर्चात वाढ झाली असल्याचे शेतकरी सांगतात.

पूर्व भागातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, चांदगिरी, मोहगाव, बाभळेश्वर, हिंगणवेढा, कालवी, गंगापाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, एकलहरे गाव, गंगावाडी या भागात गहू व कांदे काढून झाल्यावर खरीप हंगामातील पिकांसाठी ट्रॅक्टरने शेती नांगरणी करण्याची लगबग दिसून येत आहे.

-------

नगदी पिकावर भर

पूर्व भागातील शेतकरी इतर नगदी पिकांबरोबरच कोबी, फ्लॉवर, टमाटे, गवार, भेंडी, मेथी, शेपू, कोथिंबीर, कारले, गिलके, भोपळा ही भाजीपाला पिकेही बारमाही घेतात. सध्या नवीनच लावलेली कोबी, फ्लॉवर निंदणीची कामे सुरु आहेत. कोरोनामुळे इतर व्यापार उदिम बंद असला तरी भाजीपाला मार्केट काही अटी शर्तींवर सुरु असल्याने, भाजीपाला विक्रीसाठी सिन्नरफाटा मार्केट, नाशिक रोडच्या करन्सी प्रेस समोरील भाजीबाजार, जेलरोडच्या शनिमंदिर परिसरातील भाजीबाजार, लाखलगाव येथील गंगापाडळी चौफुली येथील भाजीबाजारात किरकोळ विक्री करुन शेतकरी कुटुंबाची गुजराण करीत आहेत.

कोट====

निकृष्ट कांदा बियाणे व वातावरणात वारंवार होणारा बदल याचा परिणाम झाल्याने कांद्याचे पोषण व्यवस्थित झाले नाही. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात डोंगळे आल्याने कांद्याची प्रतवारी व वजनही घटले आहे. महागडे बियाणे, औषधे, मजुरी याचा खर्च पाहता यंदा कांदा उत्पादनात घट झालेली दिसते.

-रतन धात्रक- शेतकरी, हिंगणवेढे.

(फोटो १४ एकलहरे)