शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनी भावली येथे स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 23:07 IST

घोटी : इगतपुरी तालुक्याचा पर्यटन परिसर स्वच्छ राहावा, या उद्देशाने येथील संतोष मित्रमंडळाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ६५ सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली.

ठळक मुद्देआदर्श : संतोष मित्रमंडळाचा सहभाग

घोटी : इगतपुरी तालुक्याचा पर्यटन परिसर स्वच्छ राहावा, या उद्देशाने येथील संतोष मित्रमंडळाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ६५ सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली.निसर्गाने नटलेल्या इगतपुरी तालुक्यात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नगरसह गुजरातमधील पर्यटकांची संख्या वाढली आहे. परिसरातील सर्वांचे आवडीचे ठिकाण म्हणजेच भावली धरण. या ठिकाणी धरणाच्या चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणात लहान मोठे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. पर्यटकांच्या वाहनांच्या रांगा दोन-तीन किलोमीटरपर्यंत असतात. या ठिकाणी पर्यटकांची संख्या अधिक असल्याने कचरा रोडपासून ते धबधबा परिसरात नजरेस पडतो. दिवसेंदिवस पर्यटकांकडून परिसर अस्वच्छ होत असून, कुठल्याही प्रकारची यंत्रणा नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी चपलांचा ढीग, विविध प्रकारच्या बाटल्या, फेकलेले अन्न, खाद्यपदार्थांच्या पिशव्या, कपडे, अशा विविध वस्तूंमुळे परिसर अस्वच्छ झाला आहे. याची दखल घेत संतोष मित्रमंडळाकडून स्वच्छता करण्यात आली. यात संस्थापक रामदास भोर, ज्ञानेश्वर भोर, एकनाथ कडवे, अमोल मांडे, दीपक साखला, राकेश कस्तुरे, समाधान गोईकणे, प्रभू चव्हाण, नीलेश भोर, अजय भोर, हिरामण भोर, महेश आडोळे सुनील नाठे आदींनी सहभाग घेतला.