चांदवड :येथील ‘वाव भगिनी ग्रुप’ ने १००८ विविध झाडांच्या बीया असलेले मातीचे गोळे तयार करून ते माळरानावर टाकले आहेत. यातून काही झाडे उगवतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.मुलांना शाळेत ‘गो ग्रीन प्रोजेक्ट’ राबविण्यास सांगितला होता. यातून ही कल्पना साकारली आहे.चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांची मुले आरुष व कविश यांना त्यांच्या शाळेतून ग्रीन प्रोजेक्ट करायला सांगितला होता. विविध झाडांच्या बीयांचे मातीचे गोळे तयार करण्याच्या प्रोजक्टची कल्पना त्यांनी त्यांची आई म्हणजेच रिंकू कासलीवाल यांना सांगितला आईला ही संकल्पना योग्य वाटली. रिंकू कासलीवाल ही कल्पना ‘वाव भगिनी ग्रुप’पुढे मांडली.भगवान ऋषभ भगवान यांच्या प्रेरणेने या ग्रुपमधील महिलांनी १००८ मातीचे गोळे तयार केले. डोंगर परिसर, रिकामी जागा अशा ठिकाणी हे गोळे टाकण्यात आले. या पावसाळ्यात या १००८ बियांपैकी अर्धे गोळे उगवतील, अशी आशा ग्रुपने व्यक्त केली आहे. वाव ग्रुपच्या सदस्य जयश्री मोदी, वंदना कोचर, अर्चना डुंगरवाल, साधना दर्डा, श्वेता अग्रवाल, प्रियंका संकलेचा, स्नेहल कंकारिया, रूपाली डुंगरवाल, मोनिका डुंगरवाल, सोनल लुणावत, रत्ना निकम यांनी बीया असलेले हे मातीचे गोळे तयार केले आहेत.
वृक्षलागवडीसाठी माळरानावर टाकले मातीचे गोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 16:00 IST
चांदवड : येथील ‘वाव भगिनी ग्रुप’ ने १००८ विविध झाडांच्या बीया असलेले मातीचे गोळे तयार करून ते माळरानावर टाकले ...
वृक्षलागवडीसाठी माळरानावर टाकले मातीचे गोळे
ठळक मुद्दे चांदवड : येथील ‘वाव भगिनी ग्रुप’ ने १००८ विविध झाडांच्या बीया असलेले मातीचे गोळे तयार करून ते माळरानावर टाकले आहेत. यातून काही झाडे उगवतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.