शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नववी ते बारावीच्या क्लासेसला परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:18 IST

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्राचे नुकसान टाळण्यासाठी नागरिक व क्लासेस ...

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्राचे नुकसान टाळण्यासाठी नागरिक व क्लासेस संचालकांकडून क्लासेस सुरू करण्याची मागणी होत होती. त्यांच्या मागणीनुसार शुक्रवार (दि.१५)पासून नववी ते बारावीपर्यंतचे खासगी क्लासेस सुरू करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, क्लासेसचालकांनी शासनाचे सुरक्षाविषयक मार्गदर्शक सूचना व नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची कमी होतांना दिसत असून रुग्णसंख्या पंधराशेपेक्षा खाली आलेली आहे. जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाणही कमी आहे. कोरोनाचा प्रादुर्भावाचे प्रमाण कमी झाल्याने नवीन वर्षात नववी व बारावीच्या शाळाही सुरू करण्यात आल्या आहेत. शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती ७० ते ८० टक्के असल्याने विद्यार्थ्यांचा प्रतिसाद दिलासादायक असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेक पालकांची व क्लासेसच्या संचालकांची मागणीनुसार क्लासेस सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोट-१

अनलॉक जाहीर झाल्यानंतर टप्प्या-टप्प्याने सर्वच व्यवसाय व सेवा सुरू करण्यात येत आहे, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शाळा, क्लासेस सुरू करणे आवश्यक असल्याने क्लासेस सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

-सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

कोट-२

क्लासेस सुरू करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयाचे नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना स्वागत करीत आहे​. गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेल्या शिकवणी वर्गांमुळे जिल्ह्यातील जवळपास दोन हजार क्लासेस संचालकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली होती. शाळा, महाविद्यालयांबरोबर क्लासेसलाही अधिकृत परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही सातत्याने करत होतो. आज त्याला यश मिळाले आहे.

- जयंत मुळे, अध्यक्ष, कोचिंग क्लासेस संचालक संघटना, नाशिक.