शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या किमान तपमानाचा पारा अडकला १५ अंशांवर...

By admin | Updated: November 2, 2014 23:47 IST

थंडी लांबली : आणखी पंधरा दिवसांनी तपमान घसरण्याचा वेधशाळेचा अंदाज; सध्या पहाटे व रात्री जाणवतोय गारवा

नाशिक : दिवाळीच्या काळात हजेरी लावल्यानंतर कमी झालेल्या थंडीने पुन्हा हजेरी लावली असली, तरी हा पारा १५ वरच स्थिरावल्याने थंडीचा पारा वाढण्यासाठी आणखी १५ दिवस वाट पाहावी लागणार असल्याचे पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले. दिवाळीच्या दरम्यान कमी पावसामुळे कमी झालेले तपमान २५ तारखेपासून पुन्हा वाढायला सुरुवात झाली होती; परंतु २७ तारखेपासून हा पारा पुन्हा २० च्या आत येऊ लागला. २७ तारखेला १९ वर असलेला पारा त्यानंतर हळूहळू खाली येऊ लागल्याने आता थंडीचे दिवस आले असे समजून उबदार कपडे वर येऊ लागले. सायंकाळनंतर काही ठिकाणी शेकोट्याही पेटू लागल्या; परंतु हा पारा १४ आणि १५ वरच थांबल्याने थंडीनेही विश्रांती घेतली. त्यामुळे दिवसा गरम आणि रात्री थंडी असे वातावरण निर्माण झाले. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार सध्या तरी तपमानाचा पारा १५ वरच स्थिर राहणार असल्याने येत्या काही दिवसांत तरी थंडीचे प्रमाण वाढणार नसल्याचे स्पष्ट होते आहे. त्यामुळे किमान पंधरा दिवस तरी पारा १५ च्या खाली येण्याची शक्यता नसून त्यानंतर पारा कमी होण्याची दाट शक्यता आहे. (प्रतिनिधी)