शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोत भूमिगत जलकुंभ

By admin | Updated: July 26, 2016 00:11 IST

प्रभाग ४७ : सात हजार नागरिकांना होणार पाणीपुरवठा

 नरेंद्र दंडगव्हाळ  सिडकोनाशिक शहरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असून, यंदाच्या वर्षी तर धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने संपूर्ण शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्यात आली होती. भविष्यात नागरिकांना पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी सिडकोतील शिवसेना नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी प्रभागात भूमिगत जलकुंभाची संकल्पना साकारली असून, यामुळे प्रभागाचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार आहे.सिडकोतील प्रभाग क्रमांक ४७ मध्ये सुमारे १० लक्ष लिटर क्षमतेचा भूमिगत जलकुंभ उभारण्यात आला आहे. सिडको भागात कायमच पाणीपुरवठा कमी दाबाने होणे, अनेकदा पाणीपुरवठाच न होणे अशा कारणांनी पाणीप्रश्न गाजत असतो. यंदाच्या वर्षी तर धरणातील पाणीसाठाच कमी झाल्याने मनपाच्या वतीने संपूर्ण नाशिक शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्यात आली होती. पावसामुळे धरणसाठ्यात वाढ झाल्याने ती रद्द करण्यात आली असली तरी भविष्यातही पाणीप्रश्नासाठी नगरसेवकांना झटावे लागणार आहे. सिडकोतील प्रभाग क्रमांक ४७ मधील नागरिकांना यापुढील काळात पाणीपुरवठा सुरळीत व जादा दाबाने होण्यास मदत मिळणार असून, महापालिकेच्या वतीने या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली होती. भूमिगत जलकुंभामुळे नागरिकांना जादा दाबाने पाणीपुरवठा होणार असून, ज्या भागात कमी दाबाने तो होत असेल, अशा भागातील नागरिकांनाही जादा दाबाने पाणी मिळण्यास मदत होणार आहे. सदरच्या भूमिगत जलकुंभात बारा बंगला पंपिंग स्टेशन येथून थेट पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सिडकोसह संपूर्ण शहरातील जलकुंभात रात्रीच्या वेळी पाणीपुरवठा केला जातो. यानंतर जलकुंभ भरल्यानंतर नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. रात्रीच्या वेळी बारा बंगला पंपिंग स्टेशन येथे तांत्रिक बिघाड झाल्यास दुसऱ्या दिवशी नागरिकांचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो, परंतु अशाही परिस्थितीत या भूमिगत जलकुंभातून प्रभागात पाणीपुरवठा करण्यात येऊ शकतो. म्हणजे तांत्रिक बिघाडामुळे जरी इतर भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला, तरी येथील पाणीपुरवठा सुरळीत राहणार असून याचा नागरिकांना फायदा होणार आहे. विशेष म्हणजे जमिनीच्या वर जलकुंभ उभारण्यासाठी सुमारे एक कोटीचा खर्च येत असून, भूमिगत जलकुंभासाठी साठ लाखांच्या आसपास खर्च येत असल्याने यातून मनपाच्या निधीतही बचत होण्यास मदत होणार आहे.