शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोत ४० हजारांहून अधिक मूर्तींचे संकलन

By admin | Updated: September 11, 2014 00:27 IST

सिडकोत ४० हजारांहून अधिक मूर्तींचे संकलन

सिडको : महापालिकेच्या सिडको बांधकाम विभागाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही मूर्तीचे नदीत विसर्जन न करता मूर्ती संकलनाची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात आली होती. यास यंदाच्या वर्षीही मोठा प्रतिसाद मिळाला असून, तब्बल ४१,८५९ गणपती मूर्ती संकलित करण्यात आल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.महापालिकेच्या सिडको बांधकाम विभागाचे प्रमुख प्रकाश पठाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आय.टी.आय. पूल येथे सुसज्ज गणेश विसर्जन घाट तयार करण्यात आला होता. याठिकाणी गणेशभक्तांना पार्किंगची व्यवस्था तसेच गणेशमूर्ती व निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. आय.टी.आय. पूल याबरोबरच पवननगर मैदान, राजे संभाजी क्रीडा संकुल, गोविंदनगर येथील न्यू ईरा स्कूल, पिंपळगाव खांब आदि ठिकाणी कृत्रिम तलाव तसेच गणेशमूर्ती दान करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मागील वर्षी मनपाच्या सिडको विभागातून सुमारे १८ हजार मूर्तींचे संकलन झाले होते. यंदाच्या वर्षी यात दुपटीहून अधिक वाढ झाली असून, यंदा सुमारे ४१,८५९ मूर्तींचे संकलन झाले. आय.टी.आय. पूल येथील गणेश घाटावर महापालिका आयुक्त पोंक्षे, शहर अभियंता सुनील खुने यांनी भेट दिली व नागरिकांना गणेशमूर्ती पाण्यात न बुडवता दान करण्याबाबत आवाहन केले. गणेश घाटावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, विभागीय अधिकारी ए. पी. वाघ, बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रकाश पठाडे, आरोग्य विभागाचे विठ्ठल पवार, माजी नगरसेवक बाळासाहेब मटाले, नगरसेवक तानाजी जायभावे आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)