शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोमध्ये पेट्रोल पंपावर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:50 IST

सिडको : ठाणे गुन्हे शोध पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सिडको परिसरातील दत्तमंदिर स्टॉपजवळील एचपी कंपनीच्या विशाल पेट्रोपंपावर पोलिसांनी छापा टाकला.

लोकमत न्यूज नेटवर्क सिडको : ठाणे गुन्हे शोध पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सिडको परिसरातील दत्तमंदिर स्टॉपजवळील एचपी कंपनीच्या विशाल पेट्रोपंपावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांना काही आक्षेपार्ह आढळून आले नाही; मात्र संशयास्पद दोन पल्सर कार्ड तपासणीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सिडकोमधील सदर पेट्रोल पंपावर प्रमाणापेक्षा कमी पेट्रोल ग्राहकांना मिळत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार नागपूर, पुणे, रायगड, मुंबई व नाशिक शहरांत पेट्रोल पंप तपासणी माहिमेअंतर्गत या पंपाची संशयास्पद म्हणून तपासणी करण्यात आली. येथील सर्व युनिटची तपासणी पथकाने केली. यावेळी दोन युनिटमध्ये असलेल्या पल्सर कार्डमध्ये काहीतरी छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी सदर कार्ड जप्त केले आहे. गुन्हा दाखल करून कारवाई करण्यासारखा गंभीर प्रकार आढळून आला नाही किंबहूना तसे पुरावे आढळून आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पल्सर कार्डच्या पडताळणीत छेडछाड उघड झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. परिमसेबल उणे १५ किंवा त्यापेक्षा कमी आढळून आले. या कारवाई दरम्यान कंपनीचे विक्री विभागाचे व्यवस्थापकही हजर होते. १५ पेट्रोल पंप रडारवरशहरातील दहा ते बारा पेट्रोल पंपांची तपासणी करण्यात आली असून, काही संशयास्पद पेट्रोल पंपावरील पल्सर कार्ड पडताळणीसाठी कंपनीकडे पाठविण्यात आले आहे. याबाबत अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी सांगितले. कारवाई सुरूच राहणार असून, शहर व परिसरातील बहुतांश पेट्रोल पंपांबाबत तक्रारी असून, एकूण १५ पेट्रोल पंप रडारवर असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.