शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतले त्र्यंबकराजाचे दर्शन

By admin | Updated: January 3, 2016 00:02 IST

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतले त्र्यंबकराजाचे दर्शन

त्र्यंबकेश्वर : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कुटुंबीयांसह शनिवारी त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्री त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत पत्नी मीनल, मुलगा कुणाल, कार्तिक आदि उपस्थित होते. शिवराजसिंह चौहान यांनी महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्याकरिता अनेकवेळा भेटी दिल्या आहेत. उज्जैन येथील कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे येऊन प्रत्येक आखाड्यातील साधू-महंतांना त्यांनी निमंत्रण दिले होते. दुपारी त्यांचे त्र्यंबकेश्वरला आगमन झाल्यानंतर ते सोवळे परिधान करून गर्भगृहात गेले. तेथे दर्शन, धार्मिक पूजाविधी झाल्यानंतर मंदिरात लघू रुद्रअभिषेक, पूजा, आरती पार पडली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे, तहसीलदार नरेशकुमार बहिरम, नगराध्यक्ष विजया लढ्ढा, माजी नगराध्यक्ष यशोदा अडसरे, धनंजय तुंगार, योगेश तुंगार, विश्वस्त कैलास घुले, अ‍ॅड. श्रीकांत गायधनी आदि उपस्थित होते. यावेळी त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे शाल, श्रीफळ, त्र्यंबकेश्वराची प्रतिमा व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकुले, हवालदार दिवटे, दिलीप वाजे आदिंनी बंदोबस्त ठेवला होता. भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी श्री पंचायती बडा आखाड्यात प्रयाण केले. त्याठिकाणी भोजन केले. (वार्ताहर)