शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
अरुणाचल हादरलं! HIV रॅकेट आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
3
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
4
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
5
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
6
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
7
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
9
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
10
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
11
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
12
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
13
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
14
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
15
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
16
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
17
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
18
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
19
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
20
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...

स्वस्त धान्याचा लाभ मिळणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 01:08 IST

सार्वजनिक वितरण प्रणालीत ईपीडीएस प्रणालीचा वापर करण्यात आल्यामुळे रेशनमध्ये पडून राहत असलेले धान्य आता अन्न सुरक्षा योजनेत समावेश होऊनही प्रत्यक्ष लाभ न मिळू शकलेल्या शिधापत्रिकाधारकांना देण्याचा निर्णय राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला असून, त्याचा फायदा नाशिक जिल्ह्यातील हजारो शिधापत्रिकाधारकांना होणार आहे.

नाशिक : सार्वजनिक वितरण प्रणालीत ईपीडीएस प्रणालीचा वापर करण्यात आल्यामुळे रेशनमध्ये पडून राहत असलेले धान्य आता अन्न सुरक्षा योजनेत समावेश होऊनही प्रत्यक्ष लाभ न मिळू शकलेल्या शिधापत्रिकाधारकांना देण्याचा निर्णय राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला असून, त्याचा फायदा नाशिक जिल्ह्यातील हजारो शिधापत्रिकाधारकांना होणार आहे.  यासंदर्भात दोन आठवड्यांपूर्वीच राज्य सरकारने राज्यात ९९ लाख शिधापत्रिकाधारकांना रेशनमधून स्वस्त दरात धान्य पुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु त्याची कार्यप्रणाली जाहीर केली नव्हती. आता मात्र याबाबत आदेश जारी करण्यात आला असून, त्यात प्रामुख्याने २०१३ मध्ये लागू करण्यात आलेल्या राष्टÑीय अन्न सुरक्षा कायद्यान्वये पात्र ठरविण्यात आलेले परंतु शासनाने ठरवून दिलेल्या उद्दिष्टात न बसलेल्या व वंचित राहिलेल्या शिधापत्रिकाधारकांना आता पुन्हा या योजनेत सामावून घेण्यात येणार आहे.शासनाने २०१६ मध्ये या योजनेचा आढावा घेऊन नव्याने लाभार्थींची वाढ केली होती. त्यावेळी नाशिक जिल्ह्यात सुमारे ४४ हजार नवीन लाभार्थींचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळी ग्रामीण भागातील एकूण शिधापत्रिकाधारकांपैकी ७६ टक्के, तर शहरी भागातील ४५ टक्केच शिधापत्रिकाधारकांचा या योजनेत समावेश करण्यात आला होता. ज्यांचा योजनेत समावेश करण्यात आला त्यांना प्राधान्य कुटुंबाचा दर्जा देण्यात आला होता. परंतु ग्रामीण भागातील शिल्लक राहिलेले २४ टक्के, तर शहरी भागातील ६५ टक्के शिधापत्रिकाधारकांना ते पात्र असूनही गेल्या पाच वर्षांपासून रेशनमधून धान्य मिळत नव्हते.   त्यामुळे शासनाने गरिबांमध्येच दरी निर्माण केल्याची भावना निर्माण झाली होती. एकाच ठिकाणी राहत असलेले व समान वार्षिक उत्पन्न असलेल्यांपैकी एकाला शासनाचे स्वस्त दरात धान्य मिळत होते, तर दुसऱ्याला वंचित ठेवण्यात आल्याने त्याचा ठपका रेशन दुकानदारांवर ठेवण्यात येत होता. आता मात्र ईपीडीएस प्रणालीमुळे गेल्या दोन महिन्यांपासून रेशनमधून वाटप होणारे धान्य पडून राहत असल्याचे उघडकीस आले असून, अनेक दुकानदारांनी जून महिन्याचे धान्य उचलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडे पडून असलेले धान्य अन्न सुरक्षा योजनेत पात्र ठरलेले परंतु प्रत्यक्षात लाभ मिळत नसलेल्या शिधापत्रिकाधारकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागात ज्यांचे वार्षिक उत्पन्न ४४ हजार व शहरी भागात ५९ हजार असलेल्या शिधापत्रिकाधारकांचा लवकरच त्यात समावेश करण्यात येणार आहे.हमीपत्र भरून घेणारनव्याने रेशनमधून धान्य मिळण्यास पात्र ठरणाºया शिधापत्रिकाधारकांकडून शासन स्वसाक्षांकित हमीपत्र भरून घेणार आहे. त्यात शिधापत्रिकाधारकाने स्वत:चे वार्षिक उत्पन्न जाहीर करून या उत्पन्नाबाबत चुकीची माहिती दिल्याचे आढळल्यास शिधापत्रिकाधारकाला जीवनावश्यक वस्तू अधिनियम कायद्यान्वये शिक्षेस पात्र ठरविण्यात येणार आहे. तसेच शिधापत्रिका रद्द करून त्याबाबत कोणतीही तक्रार न करण्याचे लिहून घेण्यात येणार आहे. शिधापत्रिकाधारकाने भरून दिलेले हमीपत्र तहसीलदारांसमक्ष स्वाक्षरी करून देण्याची अट टाकण्यात आली आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय