शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चव्हाणच्या लॉकरमध्ये ६ किलोसोन्याची नाणी

By admin | Updated: May 11, 2016 00:34 IST

केबीसी घोटाळा : दोन लॉकरची तपासणी

 नाशिक : राज्यभरात गाजलेल्या केबीसी घोटाळ्यातील प्रमुख संशयित भाऊसाहेब व आरती चव्हाण या दांपत्याच्या शहरातील दोन लॉकर्सची मंगळवारी (दि़ १०) आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली़ या लॉकरमध्ये सुमारे दोन कोटी रुपयांची सहा किलो ८०० ग्रॅम सोन्याची नाणी सापडली असून, ती केबीसीत गुंतवणूक वाढविणाऱ्या एजंटांना देण्यासाठी तयार करण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे़आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी केबीसीचा संचालक भाऊसाहेब व आरती चव्हाण यांच्या रविवार पेठेतील जानकी अपार्टमेंटमधील नगर अर्बन को-आॅप. बँकेतील लॉकरची तपासणी केली़ (पान ९ वर)या लॉकरमध्ये ६ किलो ६०० ग्रॅम सोन्याची नाणी आढळून आली़ यानंतर मेरी येथील स्टेट बँक आॅफ इंडियामधील लॉकरची तपासणी केली असता तेथे २०० ग्रॅम सोन्याची नाणी आढळून आली़नगर अर्बन व स्टेट बँक आॅफ इंडियाच्या या दोन्ही बँक लॉकरमधील मालमत्तेची आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दोन पंच व बँकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पोलीस दप्तरी नोंद केली आहे़ सद्यस्थितीत ही मालमत्ता बँकेच्या लॉकरमध्येच ठेवण्यात आली असून, केबीसी प्रकरणात शासनाने नियुक्त केलेले उपजिल्हाधिकारी यावर निर्णय घेणार आहेत़ भाऊसाहेब चव्हाण याच्या आणखी एक लॉकरची तपासणी बाकी असून ती बुधवारी (दि़११) केली जाणार आहे़ दरम्यान, भाऊसाहेब चव्हाण याच्या भावाच्या नावे आणखी दोन लॉकर असून, ते उघडण्यासाठी लवकरच त्यांचा न्यायालयाकडून ताबा मागितला जाणार आहे़ चव्हाणचे हे तिसरे लॉकर व भावाच्या दोन लॉकरमध्ये आणखी किती सोन्याची नाणी निघतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे़ (प्रतिनिधी)