शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
4
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
5
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
6
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
7
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
8
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
9
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
10
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
11
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
12
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
13
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
14
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
15
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
16
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
17
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
18
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
19
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
20
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
Daily Top 2Weekly Top 5

देयकांमध्ये शुल्कवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:20 IST

वीज वितरण कंपनीच्या वीज आकार देयकांमुळे ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. वीज वितरण कंपनी ग्राहकांची सर्रास लूट करीत आहे.

मालेगाव : वीज वितरण कंपनीच्या वीज आकार देयकांमुळे ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. वीज वितरण कंपनी ग्राहकांची सर्रास लूट करीत आहे.वीज ग्राहकांच्या वीज वापराची माहिती दरमहा मीटर वाचन करून मासिक आकार देयके देऊन पैसे वसूल केले जातात. वीज देयकांमध्ये स्थिर आकार, प्रतिजोडणी, वहन आकार, इंधन समायोजन आकार, वीज शुल्क आदी छुप्या करांची आकारणी केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वीजबिलांच्या रकमांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते.१ एप्रिल २०१७ पासून वीज वापराचे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. घरगुती वीज वापरासाठीचा दर युनिटच्या टप्प्यांवर अवलंबून असतो. विजेचा वापर पहिल्या शंभर युनिटच्या आत असेल तर वीजबिल वाजवी येते. परंतु वीज वापर शंभर युनिटच्या पुढे गेला तर मात्र वीज युनिटचा दर दुपटीहून जास्त आहे. याशिवाय इतर छुपे कर लावले जातात. त्यामुळे वीजबिलांची रक्कम ग्राहकांना न परवडणारी आहे. घरगुती वीजवापर ग्राहकांसाठी दरानुसार वापर युनिटवर विजेची आकारणी होते. परंतु याव्यतिरिक्त स्थिर आकार ६० रुपये प्रतिजोडणी महिना, वहन आकार १.२१ रुपये प्रतियुनिट, वीज शुल्क आकार १६ टक्के, इंधन समायोजन आकार आदी छुप्या करांची आकारणी करून वीज ग्राहकांची लूट केली जात आहे. महावितरण ग्राहकांच्या वीज वापर मीटरचे रीडिंग (वाचन) खासगी एजन्सीकडून केले जाते. वीज मीटर रीडिंग एजन्सीवर महावितरण कंपनीचे नियंत्रण राहिलेले नाही. कायद्याने ३० दिवसांचे वीजबिल देणे बंधनकारक असूनही महावितरणकडून वीज ग्राहकांना दोन महिन्यांचे, रीडिंग उपलब्ध नाही, सरासरी वीज देयके अशी वितरण कंपनी व मीटर रीडिंग एजन्सीच्या सोयीनुसार वीज देयके तयार करून रक्कम वसूल केली जाते. तसेच वीज देयके ग्राहकांना घरपोच देताना निष्काळजीपणा होत आहे.