शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

मतदान यंत्रावर नाव बदलल्याने धडकी

By admin | Updated: February 17, 2017 23:28 IST

प्रचारावर पाणी : माहेर-सासरच्या नावावरून संभ्रम; ‘निशाणी’वर दारोमदार

नाशिक : निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. मतदान अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले असताना प्रभाग क्रमांक १५मधील एका अपक्ष उमेदवाराला धडकी भरली आहे. कारण त्या महिला उमेदवाराला निवडणूक आयोगाने ज्या नावाने ‘निशाणी’ दिली त्या नावातच मतदान यंत्रावर बदल झाला आहे. त्यामुळे या उमेदवाराच्या प्रचारावर पाणी फिरण्याची भीती व्यक्त होत आहे.  प्रभाग क्रमांक १५ ब सर्वसाधारण महिला गटातून अपक्ष उमेदवारी करणाऱ्या परदेशी सीमा भास्कर यांच्या मतदान यंत्रावर परदेशी सीमा राजेंद्र असा उल्लेख असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. यानंतर परदेशी यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा के ला. यावेळी त्या म्हणाल्या, निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान कार्डावरील उमेदवाराचे नाव व अर्जावरील नावात फरक असल्यामुळे सदर अर्ज स्वीकारला नाही. मतदान कार्डावर जे नाव आहे त्याच नावाने अर्ज भरावा लागेल, असे सांगितले. त्यानंतर परदेशी यांनी नावात दुरुस्ती करून कार्डावरील नावाप्रमाणे परदेशी सीमा भास्कर असा नामोल्लेख करत उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला. ८ फेबु्रवारी रोजी उमेदवारांना निशाणी वाटप करण्यात आली तेव्हादेखील परदेशी यांना ज्या नावाने दुरुस्ती करून अर्ज भरून दिला त्याच नावाने ‘गॅस सिलिंडर’ ही निशाणी देण्यात आली होती. यामुळे त्यांनी प्रचारामध्येदेखील त्याच नावाने प्रचार केला; मात्र मतदान अवघ्या तीन दिवसांवर आले असताना अचानकपणे या प्रभागातील १५ बच्या मतदान यंत्रावर परदेशी यांचे नाव जुन्या पद्धतीनेच छापून आल्याने त्यांना धडकी भरली आहे. एकूणच प्रचारामध्ये वापरण्यात आलेले नाव आणि मतदान यंत्रावरील नाव भिन्न असल्याने त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर नाराजी दर्शविली आहे.(प्रतिनिधी)आॅनलाइन अर्ज ग्राह्यपरदेशी यांनी आॅनलाइन अर्ज भरताना सासरचे ‘परदेशी सीमा राजेंद्र’ असा नामोल्लेख केला होता. या अर्जाची प्रत सादर केली असता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान कार्डावरील नावाप्रमाणे अर्ज नसल्याने तो नाकारला. नाव दुरुस्ती करून नव्याने अर्ज सादर क रण्यास परदेशी यांना सांगितले; मात्र मतदान यंत्रावर आॅनलाइन अर्जानुसारच नाव छापले गेल्याने त्या बुचकळ्यात पडल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाच्या गलथान कारभारामुळे माझे चुकीचे नाव मतदान यंत्रावर छापले गेल्याचा आरोप परदेशी यांनी केला आहे.