शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

नवीन विकास आराखड्यात पूररेषेत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 01:11 IST

नाशिक : राज्य शासनाने नवीन विकास आराखड्यातील अंतिम नकाशे प्रसिद्ध केले असले तरी त्यात सातपूर भागातील पूररेषा हलविण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्य शासनाने नवीन विकास आराखड्यातील अंतिम नकाशे प्रसिद्ध केले असले तरी त्यात सातपूर भागातील पूररेषा हलविण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे, महापालिकेने चुकीची दुरुस्ती करण्यासाठी शासनाकडे नकाशा पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.  महापालिकेचा भागश: विकास आराखडा राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने दि. ९ जानेवारी २०१७ रोजी घोषित केला होता. भागश: प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम विकास आराखड्यातील विविध ७७ आरक्षणांमध्ये सुधारणा करण्यात आल्या होत्या. त्यातील ३१ आरक्षणे वगळण्यात आली होती. प्रामुख्याने, त्यात रहिवासी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ करतानाच बगिचे, प्रदर्शनीय मैदान यांसारख्या सार्वजनिक आरक्षणांना कात्री लावण्यात आली होती. ७९ आरक्षणांबाबत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. हरकती व सूचनांवर सुनावणी होऊन नवीन विकास आराखड्याच्या अंतिम नकाशांची प्रतीक्षा लागून होती. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी विकास आराखड्याचे अंतिम नकाशे दुरुस्तीसह प्रसिद्ध करण्यात आले. या नवीन विकास आराखड्यातील नकाशांमध्ये गोदावरी नदीवरील सातपूर भागातील लाल व निळी पूररेषाच हलविण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा विकास आराखड्याविषयी संशय निर्माण झाला आहे. सदर पूररेषा हलविण्याचा प्रकार कोणाच्या हितासाठी झाला, याची चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान, राज्य शासनाने अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंबंधी जाहीर केलेल्या धोरणाबद्दलही काही सूचना महापालिकेने पुन्हा एकदा शासनाला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. सदर धोरण जाहीर झाल्यानंतर महापालिकेने त्यात नाशिकच्या संबंधी एफएसआय बदलाबाबतच्या काही सूचना मांडल्या होत्या. परंतु, धोरणात त्याचा समावेश झाला नसल्याने मनपाने पुन्हा एकदा त्यासाठी पाठपुरावा करण्याचे ठरविले आहे.