शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

पाटोद्यात सत्ता परिवर्तन, प्रस्थापितांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 01:30 IST

पाटोदा : संपूर्ण येवला तालुक्यातील राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून असलेल्या पाटोदा ग्रुप ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक अत्यंत चुरशीची व अटीतटीची झाली असून प्रस्थापितांना धक्का देत सत्ता परिवर्तन घडले आहे.

ठळक मुद्देजनसेवा ग्रामविकासला बारा तर सत्ताधारी रामेश्वरला अवघ्या चार जागा

पाटोदा : संपूर्ण येवला तालुक्यातील राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून असलेल्या पाटोदा ग्रुप ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक अत्यंत चुरशीची व अटीतटीची झाली असून प्रस्थापितांना धक्का देत सत्ता परिवर्तन घडले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक मेंगाणे, साहेबराव आहेर, मारुती घोरपडे, रमेश बोरनारे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा ग्रामविकास पॅनलने बारा जागा जिंकत सत्ता काबीज केली तर सत्ताधारी शिवसेना तालुका प्रमुख रतन बोरनारे माजी सभापती पुंडलिक पाचपुते, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पिंपरकर यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी रामेश्वर ग्रामविकास पॅनलला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले. तर वॉर्ड क्रमांक एक (दहेगाव) मधून परिवर्तन पॅनलने एक जागा जिंकत प्रस्थापितांना धक्का दिला आहे.प्रभागनिहाय विजयी उमेदवार असे, प्रभाग क्रमांक एक (दहेगाव पाटोदा) संतोष लक्ष्मण दौंडे, सुनीता ज्ञानेश्वर आहेर, प्रभाग दोन :-उस्मानभाई कादरभाई शेख, खंडू बाबू पवार, जयश्री योगेश बोराडे, प्रभाग तीन :- प्रताप अन्साराम पाचपुते अझरुद्दीन अय्युब पठाण, सुभद्रा नंदकुमार मेंगाणे, प्रभाग चार :- मोनाली कृष्णा घोरपडे, गणेश बैरागी, वैशाली सोनावणे, प्रभाग पाच (बिनविरोध ) :- मंगला प्रभाकर बोरनारे, सविता अंकुश बोराडे, राहुल दिगंबर वरे, प्रभाग सहा :- रईस नुरमोहम्मद देशमुख, हिराबाई सुकदेव वाघ, कौशाबाई कारभारी जाधव. जनसेवा ग्रामविकास विजयासाठी रमेश काका बोरनारे प्रभाकर बोरनारे शिवाजी वैराळ, पोपट धनवटे, रियाज मुलाणी, कारभारी बोरनारे, साहेबराव पाचपुते, मच्छिंद्र आहेर, खानमहंमद पठाण, विलास पवार, वाल्मीक आहेर, प्रवीण घोरपडे, शिवराम जाधव, अंकुश बोराडे, माधव जाधव, अशोक बोराडे, श्रीधर गायकवाड, एजाज देशमुख, कादिरभाई देशमुख, मुन्नाबाबा देशमुख विठ्ठल चौघुले, संजय जाधव, कैलास मेंगाणे, कारभारी बोराडे, जमादार देशमुख, प्रल्हाद बोरनारे आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार व समर्थकांनी फटाके फोडून व गुलालाची उधळण करीत विजयोत्सव साजरा केला.

प्रमुख पराभूत उमेदवार :- माजी उपसरपंच साहेबराव महादू आहेर, माजी सरपंच सूर्यभान गंगाधर नाईकवाडे, माजी पंचायत समिती सभापती पुंडलिक पाचपुते, बाबासाहेब पवार, संपत बोरनारे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक