चांदवड : पानी फाउण्डेशन वॉटर कप स्पर्धा २०१८ चांदवड तालुक्याची आढावा बैठक प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली प्रांत कार्यालयात झाली. चांदवड तालुक्यातील ४९ गावांमधील कामाच्या प्रगतीचा आढावा या सभेत घेण्यात आला. त्याचप्रमाणे प्रमोद गोळेचा यांना उर्वरित गावांमध्ये मशीन उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना प्रांताधिकारी यांनी दिल्या. प्रांताधिकारी भंडारे यांनी प्रत्येक गावाचा कामनिहाय आढावा घेतला. यावेळी तहसीलदार डॉ. शरद मंडलिक, नायब तहसीलदार मीनाक्षी गोसावी, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र साळुंके, विजय पवार, सरपंच मनोज शिंदे, अॅड. पवनकुमार जाधव, अण्णासाहेब शिंदे, बी.पी. सोनवणे, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
चांदवडला वॉटर कप आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:06 IST