शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडला ५० ज्येष्ठ महिलांसह शिक्षकांचा सन्मान

By admin | Updated: March 9, 2017 01:06 IST

चांदवड : जागतिक महिला दिनानिमित्त येथील नगर परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते

 चांदवड : जागतिक महिला दिनानिमित्त येथील नगर परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातून काढण्यात आलेल्या फेरीत नेमिनाथ जैन विद्यालय, जे. आर. गुंजाळ विद्यालय, होळकर विद्यालयातील एकूण ५०० विद्यार्थिंनी सहभाग घेतला. यानंतर नगर परिषद कार्यालयात कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी नगरसेवक लीलाबाई माधव कोतवाल होत्या. यावेळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पुष्पा पांडे व नेमिनाथ जैन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक जयश्री गोळेचा यांचे व्याख्यान झाले. सायली केदारे या चारवर्षीय बालिकेने स्त्रीभू्रण हत्त्या व स्त्रीशिक्षणावर विचार व्यक्त केले. नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, लीलाबाई कोतवाल, गटविकास अधिकारी पुष्पा पांडे यांनी प्रत्येकी पाचशे रुपये बक्षिसे देऊन सायलीचे कौतुक केले. उपनगराध्यक्ष कविता उगले यांनी सायलीचा सत्कार केला. तहसीलदार कार्यालयामार्फत महिला मतदारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच नूतन नावनोंदणीसाठी नमुना नंबर ६ व ८ अर्जाचे वाटप करण्यात आले. त्यात विवाह होऊन आलेल्या नवविवाहितांची मतदार नोंदणी करण्याबाबत तहसीलदार डॉ. शरद मंडलिक, नायब तहसीलदार हेमंत गुरव, जंगम, दिलीप मोरे, राजू उशीर यांनी उपस्थित महिलांना माहिती दिली. कार्यक्रमात शहरातील ५० ज्येष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यात सुमनबाई जंगम, सुमनबाई भंडागे, शांताबाई सांगळे, रुक्मिणी बनकर, इंदूबाई गुरव, ताराबाई गुवर, सीताबाई बरदे, रजिया घासी, चंद्रभागाबाई शेलार, लक्ष्मीबाई क्षत्रिय, शोभना भंडारी, झुमीयाबार्स बडोदे आदिंचा सत्कार करण्यात आला. सीमा अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. कविता उगले यांनी आभार मानले. कार्यक्रमास अर्चना पूरकर, प्रतिमा गुजराथी, नगरसेवक शालिनी भालेराव, सुनीता पवार, इंदूबाई वाघ, पार्वताबाई पारवे, जयश्री हांडगे, मीनाताई कोतवाल, रेखा गवळी, सविता बांगरे, सविता जगताप, शीला खैरनार उपस्थित होत्या. (वार्ताहर)