शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडला गणेशमूर्ती कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:14 IST

येथील श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयात यू. बी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व कलाशिक्षक के. व्ही. अहिरे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा यासाठी विद्यालयात शाड ूमातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

चांदवड : येथील श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयात यू. बी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व कलाशिक्षक के. व्ही. अहिरे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा यासाठी विद्यालयात शाड ूमातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यशाळेचे हे सहावे वर्षे असून, दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. यावर्षी एकूण १३५ विद्यार्थ्यांनी विविध रुपात गणेशमूर्तीं साकारल्या. गणेशस्तोत्र पठणाने कार्यशाळेला सुरुवात झाली. सहभागी विद्यार्थ्यांना शाडू माती उपलब्ध करून देण्यात आली होती. कार्यशाळेत माती भिजवणे, त्याचे गोळे करून त्यास बैठक, पोट, चेहरा, सोंड, कान, डोळे, मुकुट यांचा कशा प्रकारे आकार द्यायचा तसेच ब्रश पट्टी, आणि बांबूच्या कोरण्यांच्या साहाय्याने मूर्तीला अधिक आकर्षक कसे करावे, यांची माहिती देऊन प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपापल्या कल्पकतेतून वेगवेगळ्या आकाराच्या गणेशमूर्ती साकारल्या. यावेळी हरित सेनेचे प्रमुख आर. एन. नेरकर, वाय. जी. सोनजे, आर. पी. चव्हाण उपस्थित होते. आकर्षक मूर्तींना प्राचार्य यू. बी. कुलकर्णी, उपप्राचार्य एस. यू. समदडिया, पर्यवेक्षक एम.टी. सोनी, सी. डी.निकुंभ आदींनी बक्षिसे जाहीर केली.