शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे आव्हान

By admin | Updated: February 24, 2016 23:52 IST

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न : नियम-निकषातही येणार अडचणी

नाशिक : महापालिकेने न्यायालयाच्या आणि शासनाच्या निर्देशानुसार शहरातील सन २००९ पूर्वीच्या आणि नंतरच्या अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी पालिकेच्या संकेतस्थळावर खुली केली असून पुरातन/प्राचीन धार्मिक स्थळे वगळता अन्य बांधकामांबाबत नियमितीकरण, स्थलांतरण आणि निष्कासन या तीन पातळ्यांवर कार्यवाही करताना महापालिकेची मोठी कसोटी लागणार आहे. येत्या दीड वर्षांत अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधी मोहीम राबविताना प्रामुख्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असतानाच नियम-निकष तपासणीतही अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे मोठे आव्हान मनपासमोर उभे ठाकले आहे.न्यायालयाचे निर्देश आणि शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिकेने पोलीस विभागाच्या साहाय्याने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण केले असता सन २००९ पूर्वीची १०६४, तर सन २००९ नंतरची २८४ धार्मिक स्थळे आढळून आली आहेत. महापालिकेने सदर धार्मिक स्थळांची यादी आपल्या संकेतस्थळावर टाकत संबंधितांकडून सूचना व पुरावे मागितले आहेत. धार्मिक स्थळांची यादी खुली करताना बव्हंशी बांधकामे ही महापालिकेच्या खुल्या जागेत करण्यात आलेली आहेत. धार्मिक स्थळांची मालकी अथवा जागामालक याबाबतही सर्वेक्षणात माहिती संकलित करण्यात आलेली आहे. परंतु, असंख्य धार्मिक स्थळांची मालकी सांगण्यास कुणीही पुढे आलेले नाही. अनेक धार्मिक स्थळांचे बांधकाम नेमके कोणत्या वर्षी झाले अथवा त्याचे नूतनीकरण कधी झाले याचीही माहिती सर्वेक्षणात उपलब्ध होऊ शकलेली नाही. त्यामुळे सन २००९ नंतरचा निकष लावताना महापालिकेची मोठी कसरत होणार आहे.