शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

सेनेला बालेकिल्ला राखण्याचे आव्हान

By admin | Updated: January 16, 2017 00:51 IST

पळसे : शिवसेनेचा उमेदवार निवडून येण्याची परंपरा

 गणेश धुरी नाशिकनाशिक गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसला अनपेक्षित लाभ झालेल्या पळसे जिल्हा परिषद गटात यंदा जसे राष्ट्रवादी कॉँग्रेससमोर गट कायम राखण्याचे आव्हान आहे, तसेच आव्हान ते शिवसेनेसमोर पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या पळसे गटावर पुन्हा सत्ता मिळविण्याचे आहे. कारण गेल्या तीन पंचवार्षिकपासून येथून शिवसेनेचा उमेदवार निवडून येण्याची परंपरा आहे. २००२ राजेंद्र तुंगार, त्यांच्या अकस्मात मृत्यूनंतर त्यांचे बंधू संजय तुंगार, त्यानंतर शिवसेनेचेच कैलास चौधरी व आता राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अलका साळुंखे माजीमंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या व तत्कालीन महापौर नयना घोलप यांच्या भगिनी दीपा घोलप यांना पराभूत करून निवडून आल्या आहेत. नाशिक सहकारी साखर कारखानाही याच गटात येत असल्याने सहकाराभोवती राजकारण फिरत असते. शिंदे, सिद्धप्रिंपी व पळसे या तीन मोठ्या गावांमध्ये गटाचा निकाल बदलविण्याची क्षमता आहे. या तीनही गावांमधूनच विविध राजकीय पक्षाचे इच्छुक उमेदवारीसाठी तयार आहेत. या गटातून मागील वेळी माजीमंत्री तथा शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांची कन्या दीपा घोलप यांनी शिवसेनेकडून उमेदवारी केली होती. त्याचवेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून सर्वसामान्य असलेल्या अलका नंदकिशोर साळुंखे यांनी उमेदवारी केली. या लढतीत माजीमंत्री कन्या बाजी मारतील, असे चित्र असतानाच अचानक अपक्षांच्या एण्ट्रीने शिवसेनेच्या विजयाचे गणित बदलले आणि चक्क शिवसेनेला पराभवाचे तोंड पहावे लागले. अपक्षांच्या एण्ट्रीमुळेच शिवसेनेला पराभव पाहावा लागल्याची चर्चा त्यावेळी होती. कारण पळसे गणातून अपक्ष कैलास चव्हाण निवडून आले होते. खरेदी- विक्री संघावर तसेच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून निवडून आलेले संजय तुंगार यांचे या गटावर नेतृत्व असल्याचे त्यामुळे बोलले जाते. मात्र त्यांच्याबरोबरीनेच कार्पोरेट पंचायत समिती तसेच अत्याधुनिक तालुका क्रीडासंकुल, नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद््घाटन निवडणुकीपूर्वीच करून उपसभापती अनिल ढिकले यांनीही आपला या गटावर वरचष्मा राहील, याची काळजी घेतली आहे. त्यामुळे पळसे गटात आता शिवसेना बालेकिल्ला कायम राखते की भाजपा, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस या गटावर विजय मिळविण्यासाठी डोके वर काढतात, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.