शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चैतन्य पर्वास प्रारंभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:33 IST

‘देवा घरा आला, भक्ती सन्माने पुजिला’ याची प्रचिती शुक्रवारी (दि.२५) घरोघरी बाप्पांच्या आगमनामुळे आली. विघ्नविनाशक सुखकर्ता गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात शहरभर जल्लोषात स्वागत होत असतानाच वरुणराजानेही हजेरी लावत अभिषेक केला. सार्वजनिक मंडळांसह घरोघरी बाप्पांची विधीवत प्राणप्रतिष्ठा होत पुढील ११ दिवसांसाठी एका चैतन्य पर्वास दिमाखात प्रारंभ झाला.

नाशिक : ‘देवा घरा आला, भक्ती सन्माने पुजिला’ याची प्रचिती शुक्रवारी (दि.२५) घरोघरी बाप्पांच्या आगमनामुळे आली. विघ्नविनाशक सुखकर्ता गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात शहरभर जल्लोषात स्वागत होत असतानाच वरुणराजानेही हजेरी लावत अभिषेक केला. सार्वजनिक मंडळांसह घरोघरी बाप्पांची विधीवत प्राणप्रतिष्ठा होत पुढील ११ दिवसांसाठी एका चैतन्य पर्वास दिमाखात प्रारंभ झाला. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला शुक्रवारी घरोघरी बाप्पांची विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी बाह्य मुहूर्तापासूनच गणेशभक्तांची लगबग सुरू झाली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बाप्पांच्या स्वागताची तयारी केली गेली होतीच. श्री गणेश पूजन मध्यान्हव्यापिनी असल्याने सूर्यादयापासून माध्यान्हापर्यंत म्हणजे दुपारी दीड वाजेपर्यंत बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्याचा मुहूर्त असला तरी सायंकाळपर्यंत पूजाविधी सुरू होता. शहरात ठिकठिकाणी थाटलेल्या गणेशमूर्तीच्या स्टॉल्समध्ये गणेशभक्तांची वर्दळ होती. सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ढोलपथकांच्या माध्यमातून वाजत-गाजत, मिरवत बाप्पांचे जल्लोषात स्वागत केले, तर घरोघरी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजराने चैतन्य संचारले होते. बाप्पांच्या आगमनाचा आनंदोत्सव सुरू असतानाच अधूनमधून वरुणराजानेही हजेरी लावत बाप्पांवर अभिषेक घातला. शहरातील मानाचे गणपती असलेले रविवार कारंजावरील श्री सिद्धिविनायक गणपती, भद्रकालीतील साक्षी गणेश, गंगापूररोडवरील नवशा गणपती, अशोकस्तंभवरील ढोल्या गणपती, मेनरोडवरील गणपती या ठिकाणीही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.पूजा साहित्याचा बाजार फुललाश्रींच्या पूजेसाठी लागणाºया साहित्याचीही दुकाने शहरात चौकाचौकांत थाटलेली होती. प्रामुख्याने, बाप्पांसाठी लागणाºया पूजापत्री, कमळपुष्प, नारळ, बेल-दुर्वा, तुळशीपत्र, खारीक-सुपाºया आदी साहित्य खरेदीसाठी गणेशभक्तांची लगबग दिसून आली. फुलांनाही मोठी मागणी वाढल्याने भावही वधारले. एरवी दहा रुपयांमध्ये विक्री होणारा गुलाबफुलांचा गुच्छ ८० ते १०० रुपये डझनावरी विकला गेला, तर गणरायाचे आवडते फूल असलेल्या जास्वंदीलाही प्रचंड मागणी होती. नारळाचाही दर २५ ते ३० रुपये होता. गणेशपूजनासाठी पाच फळं लागत असल्याने फळांची बाजारपेठही खरेदीदारांच्या गर्दीने फुलली होती.गुरुजींचे नेटवर्क जामपंचांगकर्त्यांनी गणेशपूजनासाठी भद्रा वर्ज्य नसल्याचे स्पष्ट केले असले तरी अनेकांनी श्री गणेशपूजन माध्यान्हापर्यंत दुपारी १.३९ वाजेपर्यंतच करावे, असे म्हटल्याने मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी गुरुजींना मागणी वाढली होती. त्यामुळे गुरुजींचे नेटवर्क जाम राहिले. अनेकांनी ब्राह्म मुहूर्तावरच विधीवत प्राणप्रतिष्ठा केली. काही सार्वजनिक मंडळांकडून मात्र रात्री उशिरापर्यंत प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होता. त्यानिमित्त धार्मिक विधी, श्लोक पठणाचेही कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.