शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

सभापतिपदासाठी सेनेतील इच्छुकांत चुरस

By admin | Updated: September 3, 2014 00:38 IST

सभापतिपदासाठी सेनेतील इच्छुकांत चुरस

मालेगाव : जिल्हाभरातील पंचायत समित्यांसह मालेगाव पंचायत समितीचेहीे आरक्षण सर्वसाधारण जाहीर झाले असून, मावळते सभापतिपद हे महिलावर्गाकडे असल्याने आता या पंचायत समितीच्या नवीन सभापतिपदासाठी पुरुष सदस्यांमध्ये चुरस वाढली आहे. मालेगाव महानगरपालिकेत सोयगाव व द्याने या गावांचा समावेश झाल्याने जिल्हा परिषद सदस्य संख्या ही नऊ वरुन सातवर आली. तसेच पूर्वीची १८ सदस्यीय मालेगाव पंचायत समिती ही १४ सदस्यीय झाली. या पंचायत समितीवर गेली तीन पंचवार्षिक शिवसेनेची सत्ता आहे. गेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना व जनराज्य आघाडी यांच्यात जोरदार लढत झाली होती. आजमितीस सत्ताधारी शिवसेना - सात, जनराज्य आघाडी - पाच, मनसे - एक व अपक्ष एक असे पंचायत समितीतील संख्याबळ आहे. गेल्यावेळी शिवसेनेने निमगाव गणातील अपक्ष सदस्या सौ. आरती दीपक अहिरे यांना उपसभापतीपद देत सत्ता आपल्या ताब्यात राखली. मनसेचे पोपट भामरे हे तटस्थ राहिले होते तर जनराज्यचे पाचही सदस्य गैरहजर राहिले होते. त्यावेळी पंचायत समिती सभापतीपद हे महिला राखीव असल्याने या पदावर वऱ्हाणे येथील सौ. वंदना पवार बिनविरोध निवडून आल्या होत्या. पक्षीय संख्याबळात बदल झाला नसला तरी सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधातील जनराज्य आघाडीचे बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपात विलीनीकरण झाल्यामुळे मालेगाव पंचायत समिती सभापतीपद व उपसभापतीपद निवडणुकीचे समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. पं. स. सभापती व उपसभापतीपदासाठी सेना भाजपाची पारंपारिक युती होईल की त्यांच्यात मैत्रीपुर्ण लढत होईल अशी चर्चा रंगली आहे. मैत्रीपुर्ण लढत झाली तरी सध्याचे संख्याबळ पाहत सेनेचेच पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. उपसभापतीपद दिलेल्या निमगाव गणातील सौ. अनिता अहिरे आपल्याच सोबत असल्यामुळे यंदाही पंचायत समितीवर सेनेचाच भगवा फडकेल, असा दावा सेनेतर्फे करण्यात येत आहे.त्यामुळे तालुक्याचा पूर्वभाग व माळमाथा भागास न्याय देण्यासाठी यंदाचे पंचायत समिती सभापतीपद हे झोडग्याचे धर्मराज पवार यांना मिळण्याची शक्यता एकीकडे व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुका व त्यात दाभाडी गटगणाची महत्त्वपूर्ण भूमिका बघता सभापतीपदाची माळ अ‍ॅड. यशवंत मानकर यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबतीत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आमदार दादा भुसे यांना बहाल करण्यात आल्यामुळे आमदार भुसे काय निर्णय जाहीर करतात याकडे सेनेच्या सर्व पं. स. सदस्यांचे व जनतेचे लक्ष लागले आहे. मोदक सजावट स्पर्धायेवला : नेहरू युवा केंद्र नाशिक व स्वयंसेवी संस्था खटपट युवा मंच येवला यांच्या वतीने उत्कृष्ट मोदक सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आकर्षक पद्धतीने सजावट करून आकर्षक बनवून आणावे लागेल व उत्कृष्ट मोदक सजावट केलेल्या ११ स्पर्धकास बक्षीस देण्यात येतील.