शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

सभापती, उपसभापती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:57 IST

नाशिक : महापालिकेच्या विधी, आरोग्य व वैद्यकीय सहायक आणि शहर सुधारणा समित्यांच्या सभापती-उपसभापतिपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेच्या विधी, आरोग्य व वैद्यकीय सहायक आणि शहर सुधारणा समित्यांच्या सभापती-उपसभापतिपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. तीनही समित्यांवर भाजपाचे सभापती विराजमान झाले, तर आरोग्य समितीचे उपसभापतिपद योगेश शेवरे यांना बहाल केल्याने त्यानिमित्ताने मनसेही सत्तेत सहभागी झाली आहे. महापालिकेच्या तीनही विषय समित्यांच्या सभापती-उपसभापतिपदाकरिता अपर आयुक्त जोतिबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. विधी समितीच्या सभापतिपदी भाजपाच्या शीतल माळोदे, तर उपसभापतिपदी राकेश दोंदे तसेच शहर सुधार समितीच्या सभापतिपदी भाजपाचे भगवान दोंदे व उपसभापतिपदी स्वाती भामरे यांचाच एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. आरोग्य व वैद्यकीय सहायक समितीच्या सभापतिपदी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी यांचाच एकमेव अर्ज होता. त्यामुळे त्यांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. दरम्यान, आरोग्य व वैद्यकीय समितीच्या उपसभापतिपदाकरिता मनसेचे योगेश शेवरे व भाजपाच्या शांता हिरे यांनी अर्ज दाखल केले होते. परंतु, शांता हिरे यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने मनसेचे योगेश शेवरे यांचीही बिनविरोध निवड झाली. तीनही विषय समित्यांचे सभापती व उपसभापती यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचा महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, उपमहापौर प्रथमेश गिते यांनी सत्कार केला.  यावेळी, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेता दिनकर पाटील, भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर, माजी आमदार वसंत गिते आदी उपस्थित होते. माळोदे-दोंदे यांची उशिराने एण्ट्रीसुरुवातीला विधी समितीच्या सभापती व उपसभापतिपदाकरिता निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. सकाळी १०.३० वाजता प्रक्रिया सुरू होऊनही सभापतिपदाच्या उमेदवार शीतल माळोदे व उपसभापतिपदाचे उमेदवार राकेश दोंदे हे उपस्थित झाले नव्हते. अखेर भाजपातच धावपळ उडाली आणि दोहोंना दूरध्वनी करत बोलावून घेण्यात आले. दोहोंची ११.१५ वाजता महापालिकेत एण्ट्री झाल्यानंतर प्रक्रिया पूर्ण झाली. दरम्यान, निवडणुकीप्रसंगी सेनेचेही मोजकेच सदस्य उपस्थित होते.