शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक आखाजी साजरी

By admin | Updated: May 9, 2016 23:32 IST

संस्कृती : आठ दिवस सुरू असतो महिलांचा उत्सव

 पेठ :दुधाने दूध तापे, दुधावर पिवळी साय़माय म्हणे लेकी, आखाजी येई जाय़ शंकर बसला घोड्यावर, गौराई चाले पाय पाय़़़़अक्षय्य तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा वर्षातील महत्त्वाचा सण़ या सणाला शहरी भागात केवळ स्थावर मालमत्ता, सोने, चांदी, दुचाकी व चारचाकी, घरे अथवा चांगल्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त पाहिला जात असताना पेठ-सुरगाणासारख्या आदिवासी तालुक्यात मात्र आखाजी हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करून आदिवासी संस्कृतीची जोपासना केली जात असल्याचे दिसून येते़महाराष्ट्र राज्य सणांच्या बाबतीत विविधरंगी राज्य समजले जाते़ जसा प्रदेश तसे सण-समारंभ साजरे करण्याची महाराष्ट्रात प्रथा आहे़ असाच माहेरवाशिणीचा महत्त्वाचा समजला जाणारा अक्षय्य तृतीयेचा सण आदिवासी भागात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतो़साडेतीन मुहूर्तापैकी एक समजला जाणाऱ्या या सणाला आदिवासी भागात मात्र गौराईचा सण म्हणूनही साजरा करतात़ शहरी भागात खरेदी विक्रीसाठी शुभ मानली जाणारी अक्षय्य तृतीया आदिवासींची आखाजी असते़ आखाजीच्या आदल्या दिवशी घरातील कर्ते पुरुष रानात जाऊन घरातील सुना व मुलींसाठी कोडईच्या झाडाच्या लाकडापासून टिपऱ्या तयार करून आणतात, तर लहान मुले याच लाकडापासून भाले, तलवारी तयार करतात़ त्यांना विविध रंगांनी रंगवतात़सासरी गेलेल्या मुलींसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा समजला जातो़ प्रत्येक सासूरवासीन आखाजीला हमखास माहेरी येत असते़ दुपारनंतर ऊन कमी झाल्यावर घरात ठेवलेली टोपली पूजा करून बाहेर काढली जाते़ उगवलेल्या रोपाच्या टोपल्या फुलांच्या माळांनी सजवल्या जातात़ गावातील सर्व गौराई मंदिराजवळ एकत्र करून पूजा केली जाते़ डोक्यावर टोपली घेऊन पारंपरिक वाद्य वाजवून वाजत-गाजत या गौरार्इंची मिरवणूक काढली जाते़ यावेळी महिलावर्ग गौराईच्या पारंपरिक ओव्या म्हणतात़ उगवलेल्या धान्याचे कोवळे तुरे आभूषणे म्हणून डोक्याला, कानात लावले जातात़सायंकाळी अतिशय भक्तिमय वातावरणात या गौरार्इंचे सार्वजनिक तलाव, नदी अशा ठिकाणी पाण्यात विसर्जन केले जाते़ या उत्सवात गावातील अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी होत असतात़ महिला टिपऱ्या खेळतात तर लहान मुले लाकडी भाले व तलवारीचे खेळ खेळताना दिसतात़विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर टोपलीतील धान्याचे तुरे गावातील लोकांच्या कानाला व डोक्याला लावून त्यांच्याकडून दोन-चार रुपये गोळा केली जातात़ यावेळी महिला पारंपरिक गाणे सादर करतात़अशा पद्धतीने शहरी भागात अक्षय्य तृतीया केवळ शुभ दिवस म्हणून सोने-चांदीच्या खरेदीसाठी रांगा लावणाऱ्या धनधांडग्यापेक्षा खऱ्या अर्थाने या सणांचे पावित्र्य जपण्याचे व आदिवासी संस्कृती जतन करण्याचे काम आजही दऱ्याखोऱ्यात केले जात असल्याचे या उत्सवावरून दिसून येते़ (वार्ताहर)