ंमालेगाव : दाभाडी रोड येथील दौलती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘व्हेजीटेबल डे’ साजरा करण्यात आला. त्यात के. जी.च्या मुलांनी वेगवेगळ्या भाज्यांचे वेश परिधान करून त्याचे आपल्या आहारातील महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष देवीदास बच्छाव, सचिव सचिन बच्छाव, कमलताई बच्छाव, पूनम बच्छाव, प्राचार्य स्मिता अहेर आदिंसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन भारती पगार यांनी केले.
दौलती इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘व्हेजीटेबल डे’ साजरा
By admin | Updated: July 29, 2014 00:54 IST