शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या शाही मिरवणुकीचा आज रंगणार सोहळा

By admin | Updated: September 18, 2015 00:32 IST

पोलिसांकडून व्यवस्था : स्नानानंतर आखाडे गोदाघाटावरच थांबणार

नाशिक : यंदाच्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील तिसऱ्या शाहीस्नानानिमित्त वैष्णव साधूंच्या अखेरच्या शाही मिरवणुकीचा सोहळा शुक्रवारी (दि. १८) रंगणार आहे. गेल्या वेळेप्रमाणेच उद्याही बंदोबस्त शिथिल राहणार असल्याने भाविकांना हा सोहळा डोळ्यांत साठवता येणार आहे. दरम्यान, गेल्या मिरवणुकीप्रमाणेच उद्याही निर्मोही आखाडा प्रथम क्रमांकावर राहणार आहे; मात्र परतताना निर्वाणी आखाडा प्रथम क्रमांकावर असेल. शाहीस्नान होईपर्यंत आखाड्यांचे प्रमुख साधू-महंत गोदाघाटावरच थांबणार असून, त्यांच्यासाठी पोलिसांकडून स्वतंत्र मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. द्वितीय शाही मिरवणुकीत निर्बंध हटवल्याने भाविकांना या सोहळ्याचा मनमोकळा आनंद घेता आला; मात्र या मिरवणुकीत काही ठिकाणी गोंधळही उडाला. उद्याच्या मिरवणुकीत असे प्रकार टाळण्याचा पोलिसांचा प्रयत्न राहील. शुक्रवारी सकाळी ६ वाजता शाही मिरवणूक निघणार आहे. फुलांनी सुशोभित केलेले रथ, उंट-घोड्यांवर विराजमान साधू-महंत, श्री महंत-महंतांची सहाशेहून अधिक वाहने, भजन-संकीर्तन करणारे पन्नास हजारांहून अधिक साधू, डोळ्यांचे पारणे फेडणारे मर्दानी खेळ असा लवाजमा या मिरवणुकीत राहणार आहे. साधूंचे आखाडे हे ध्वज, निशाण व इष्टदेवतांना घेऊन साधुग्राममधून मिरवणुकीने एकापाठोपाठ शाहीस्नानासाठी पवित्र रामकुंडाकडे रवाना होतील. प्रथम शाही मिरवणुकीत निर्वाणी, दिगंबर व निर्मोही असा आखाड्यांचा क्रम होता. द्वितीय मिरवणुकीत त्यात बदल होऊन निर्मोही आखाडा पहिल्या क्रमांकावर राहिला होता, तर निर्वाणी आखाडा तिसऱ्या क्रमांकावर होता. उद्यादेखील हाच क्रम कायम राहणार आहे. साधुग्राममधील लक्ष्मीनारायण मंदिरापासून सकाळी ६ वाजता निर्मोही आखाड्याची मिरवणूक निघेल. ६.३० वाजता दिगंबर, तर ७ वाजता निर्वाणीच्या मिरवणुकीला प्रारंभ होईल. प्रत्येक आखाड्याच्या मिरवणुकीत दोनशे मीटरचे अंतर राहणार आहे. लक्ष्मीनारायण मंदिर, काट्या मारुती पोलीस चौकी, गणेशवाडी देवी चौक, पंचवटी आयुर्वेदिक कॉलेज, गौरी पटांगण, म्हसोबा पटांगण, सरदार चौक या मार्गे मिरवणूक रामकुंडावर पोहोचेल. तेथे निशाण व इष्टदेवतेचे विधिवत पूजन केले जाईल. इष्टदेवता हनुमानाला स्नान घातले जाईल. त्यानंतर आखाड्याच्या प्रमुख श्री महंतांचे व नंतर साधूंचे स्नान होईल. मागील दोन्ही स्नानांच्या वेळी ज्या क्रमाने आखाडे गोदाघाटावर दाखल झाले, त्याच क्रमाने साधुग्रामकडे परतले होते. उद्या मात्र तिन्ही आखाड्यांचे प्रमुख साधू-महंत स्नान झाल्यानंतर गोदाघाटावर थांबणार असून, परतताना निर्वाणी, दिगंबर व निर्मोही असा आखाड्यांचा क्रम राहणार आहे. (प्रतिनिधी)