शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी रमजान ईद उत्साहात साजरी

By admin | Updated: July 7, 2016 22:19 IST

मालेगावी रमजान ईद उत्साहात साजरी

आझादनगर : मालेगाव शहरातील मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईद (ईद- उल- फित्र) निमित्ताने पोलीस कवायत मैदानावरील मुख्य ईदगाहसह एकूण दहा ठिकाणी पारंपरिक पद्धतीने सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. मुख्य ईदगाह येथे मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी तर देवीचा मळा येथील अहमद रजा ईदगाह याठिकाणी मौलाना हाफीज गुफरान कादरी यांनी नमाजाचे नेतृत्व केले. ईद निमित्ताने इदगाह परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.गुरूवारी सकाळी मुख्य ईदगाह मैदानावर सकाळी सुमारे सव्वा नऊ वाजता ईदच्या नमाजास प्रारंभ झाला. शहरातील उर्वरित ईदगाह येथे नऊ ते साडेनऊ वाजेदरम्यान नमाज अदा करण्यात आली. नमाजनंतर मौलाना मुफ्ती मोहंमद ईस्माईल यांचा राष्ट्रीय एकात्मता समिती, महसुल विभाग आणि पोलीस दलाकडून अनुक्रमे बाजार समितीचे सभापती प्रसाद हिरे, अपर जिल्हाधिकारी डॉ. दिलीप स्वामी, प्रांताधिकारी अजय मोरे, मनपा आयुक्त रविंद्र जगताप, पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.मुस्लिम समाजात महिन्याभराच्या उपवास (रोजा) अंती रमजान ईद साजरी करण्यात येते. या पर्वाची मुस्लिम अबालवृद्ध मोठ्या आतुरतेने वाट पाहतात. त्यामुळे ईदच्या नमाज पठणासाठी शहरातील सर्वच रस्त्यांवर मुस्लीम बांधवांची गर्दी झाली होती. नमाजनंतर मुस्लिम बांधवांकडून एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पोलीस प्रशासनाकडून शहरात सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली. दोन राज्यराखीव दल, एक जलद कृती पथक, ३२ पोलीस अधिकारी, सातशे पोलीस कर्मचारी व चार बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या साह्याने अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)