शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅट्स’ची तुकडी देशसेवेसाठी सज्ज : युद्धभूमीचा थरार

By admin | Updated: May 13, 2017 22:33 IST

भारतीय सैन्य दलाचा कणा मानल्या जाणाऱ्या लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांची २७वी तुकडी देशसेवेसाठी सज्ज

नाशिक : भारतीय सैन्य दलाचा कणा मानल्या जाणाऱ्या लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांची २७वी तुकडी देशसेवेसाठी सज्ज झाली आहे. कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा २७ दीक्षांत सोहळा शनिवारी (दि.१३) लष्करी थाटात पार पडला.गांधीनगर एअरफिल्ड येथे असलेल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन स्कूलमध्ये प्रशिक्षणार्थी जवानांना लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांचे प्रशिक्षण दिले जाते. २७व्या तुकडीचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण होऊन, या तुकडीमधून २८ वैमानिक देशसेवेसाठी विविध ठिकाणी रुजू होणार आहे. युद्धजन्य परिस्थितीत हेलिकॉप्टर चालविणे, शत्रूवर हवाई हल्ला करणे, जमिनीवरील सैन्याला रसद पुरविणे, जखमींना सुरक्षित ठिकाणी उपचारार्थ हलविणे आदि बाबींचे शास्त्रशुद्ध सैनिकी लढाऊ विमानचालनाचे प्रशिक्षण या केंद्रातून प्रशिक्षणार्थी जवानांना देण्यात आले. या प्रशिक्षणार्थी जवानांचा दीक्षांत सोहळा शनिवारी पार पडला. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण के लेल्या २८ वैमानिकांना ‘एव्हिएशन विंग’ व ‘प्रमाणपत्र’ लेफ्टनंट जनरल आर. एस. सलारिया विशिष्ट सेवा मेडल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेले सलारिया यांनी यावेळी लढाऊ वैमानिकांच्या तुकडीला मार्गदर्शन करताना सांगितले.

धाडस व कौशल्याच्या जोरावर उड्डाण करणारा लढाऊ वैमानिक नेहमीच यशस्वी ठरतो. राष्ट्रसेवेसाठी ‘एव्हिएशन स्कूल’च्या उत्कृष्ट अशा व्यासपीठावरून तुमचे भारतीय सैन्यदलात आगमन झाले आहे, त्याचा अभिमान बाळगावा आणि स्वत:ला सिद्ध करून अभिमानास्पद कामगिरीवर भर द्यावा. लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिक हा भारतीय सैन्य दलाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, असेही सलारिया म्हणाले. याप्रसंगी ब्रिगेडियर कमांडंट विनोदकुमार बारी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.