शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कट मारल्याची कुरापत काढून घातला वाद, पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल

By admin | Updated: July 5, 2016 21:33 IST

पेठरोडवरील उज्जीवन फायनान्स कंपनीकडे जमा झालेली दिवसभरातील रक्कम लॉकर्समध्ये जमा करणाऱ्यासाठी वाहनातून जात असलेल्या कर्मचाऱ्याच्या डोक्यास बंदूक लावून

ऑनलाइन लोकमतनाशिक : पेठरोडवरील उज्जीवन फायनान्स कंपनीकडे जमा झालेली दिवसभरातील रक्कम लॉकर्समध्ये जमा करणाऱ्यासाठी वाहनातून जात असलेल्या कर्मचाऱ्याच्या डोक्यास बंदूक लावून वाहनातील सुमारे अकरा लाख रुपये लूटून नेल्याची घटना मंगळवारी (दि़५) सायंकाळच्या सुमारास रामवाडीतील कोशिरे मळा रस्त्यावर घडली़ विशेष म्हणजे या घटनेनंतर पोलिसांनी नाकाबंदी करूनही चोरटे हाती लागले नाहीत़ दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेठरोडवरील सिताराम चेंबर्समध्ये उज्जीवन फायनान्स कंपनीचे कार्यालय असून तेथे योगेश तांबे हे जमा झालेली रक्कम लॉकरमध्ये ठेवण्याचे काम करतात़ मंगळवारी दिवसभर कार्यालयात जमा झालेली १० लाख ८६ हजार रुपयांची रक्कम जमा करून ती वसंत मार्केटमधील कविता लॉकर्समध्ये जमा करण्यासाठी कर्मचारी तांबे हे सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास व्हॅनमधून (एमएच १५, ईएक्स ५४१७) जात होते़ रामवाडी येथील कोशिरे मळा परिसरातील रस्त्याने जात असताना तांबे यांच्या व्हॅनला नंबरप्लेट नसलेली स्प्लेंडर व सीबीझेड या दुचाकीवरील चौघांनी अडविले़ या चौघांनी खाली उतरून तांबे यांना दुचाकीला कट का मारला अशी कुरापत काढून वाद घातला़ तर काही समजण्याच्या आतच एका संशयिताने तांबे यांच्या कानशिलास बंदूक लावून व्हॅनमधील रोकड घेऊन चोपडा लॉन्सच्या दिशेने पळ काढला़ या लुटीची माहिती तांबे यांनी पोलिसांना देताच पोलीस उप आयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त विजय चव्हाण, वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्ढेकर हे घटनास्थळी दाखल झाले़ पोलीस अधिकाऱ्यांनी उज्जीवन फायनान्स कंपनीतील सीसीटीव्हीची पाहणी केली असून यामध्ये संशयास्पद व्यक्ती आढळून आली नाही़ या संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शहरात सर्वत्र नाकाबंद करून शोध घेण्याचाही प्रयत्न केला मात्र यश आले नाही़ दरम्यान पंचवटी पोलिसांनी निमाणी व म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतून तीन गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसे जप्त केली असली तरी काही तासातच हा गुन्हा घडल्याने चोरट्यांनी आव्हान दिल्याचे दिसून येते़ (प्रतिनिधी)